Uddhav Thackeray-Ramdas Kadam Sarkarnama
मुंबई

Konkan News : रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंची लाज काढली...

अडीच वर्षे काम केले म्हणून सांगता. काय काम केले तुम्ही? पक्ष संपवलात.

सरकारनामा ब्यूरो

खेड : गेल्या दोन-अडीच वर्षांत तुम्ही शिवसेनेच्या एका तरी आमदाराला विकासकामासाठी निधी दिला का. दोन वर्षे तुम्ही मातोश्रीत लपून बसलात आणि अजितदादा मंत्रालयात जाऊन बसत होते. अजितदादांनी राष्ट्रवादीला ५७ टक्के निधी दिला होता. काँग्रेसला ३३ टक्के, तर मुख्यमंत्री असलेल्या शिवसेना पक्षाला १६ टक्के निधी मिळाला. लाज वाटत नाही, उद्धवजी तुम्हाला. अडीच वर्षे काम केले म्हणून सांगता. काय काम केले तुम्ही, पक्ष संपवलात, अशा शब्दांत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. (Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray)

खेडमधील सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर टीका केली होती. त्याला रामदास कदम उत्तर देत होते. ते म्हणाले की, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर तेव्हा तुमची चड्डी पिवळी झाली होती. तुमच्या गाडीत पुढच्या सीटवर रामदास कदमला बसवल्याशिवाय तुम्ही मातोश्रीतून बाहेर पडत नव्हता आणि तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जीभ हासडायची भाषा करता उद्धवजी. तमच्यावर किती केसेस आहेत. शिवसेना मोठी होण्यात, तुमचा काय सहभाग आहे. शिवसेना अशीच मोठी झाली नाही, हे तुम्हाला काय माहिती आहे.

हिंदुत्वाची भाषा तुमच्या तोंडामध्ये शोभत नाही, उद्धवजी. ज्या वेळी तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात त्याच दिवशी तुमचं सर्व हिंदुत्व संपलं. आता तुम्ही लोकांना फसवत आहात, भावनात्मक ब्लॅकमेल करत आहात, अशी टीकाही कदम यांनी केली.

अयोध्या दौऱ्याची सर्व व्यवस्था मी केली, संजय राऊत त्याचे साक्षीदार

उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा जो दौरा केला होता, त्या दौऱ्याची सर्व व्यवस्था मी केली होती. सगळी व्यवस्था म्हणजे तुम्हाला कळलं असेल. खासदार संजय राऊत त्याचे साक्षीदार आहेत. आदल्या दिवशी मला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि सांगितलं की, तुम्ही माझ्यासोबत अयोध्येला यायचं नाही. त्याचं कारण मला काही कळलं नाही, असा गौप्यस्फोटही माजी मंत्री रामदास कदम यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT