Ramdas Kadam : 'कदमांना संपविण्यासाठी ‘मातोश्री’त शिजलेली कटकारस्थाने उदय सामंत १९ तारखेला उघड करणार'

स्वतःच्याच आमदारांना संपविण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
Uday Samant-Yogesh Kadam-Ramdas Kadam
Uday Samant-Yogesh Kadam-Ramdas KadamSarkarnama

खेड : तुम्ही फक्त रामदास कदमांना (Ramdas Kadam) संपवून थांबला नाही, तर माजी मंत्री अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगेश कदमांनाही दापोलीच्या राजकारणातून पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात मातोश्रीत काय काय बैठका झाल्या, हे उद्योगमंत्री उदय सामंत येत्या १९ तारखेला सांगणार आहेत, असे माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. (Uday Samant will tell what happened in 'Matoshri ' to eliminate Yogesh Kadam from politics on 19th: Ramdas Kadam)

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी रविवारी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी कदम यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याला पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांनी आज उत्तर दिले. त्यात त्यांनी वरील गौप्यस्फोट केला.

Uday Samant-Yogesh Kadam-Ramdas Kadam
Thackeray Vs Kadam : उद्धव ठाकरेंनी ‘ते’ सिद्ध केले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेन : रामदास कदमांचे आव्हान

रामदास कदम म्हणाले की, ज्या राज ठाकरेंनी लीलावतीमधून ड्रायव्हिंग करत उद्धव ठाकरे यांना मातोश्रीपर्यंत आणले. त्याच राज यांचे कार्यकर्ते संदीप देशपांडे यांच्यावर कोणी हल्ला केला. योगेश कदम यांचा जो अपघात झाला आहे, त्याचीही चौकशी अजून सुरू आहे. तुम्ही फक्त रामदास कदम यांना संपवून थांबला नाही, तर माजी मंत्री अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगेश कदम यांनाही दापोलीच्या राजकारणातून पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केला.

Uday Samant-Yogesh Kadam-Ramdas Kadam
Uddhav Thackeray Sabha ....हा तर चुना लगाव आयोग : उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर जोरदार बरसले

उद्योगमंत्री उदय सामंत हे १९ तारखेला हे सर्व सांगणार आहेत. या संदर्भाने मातोश्रीत काय काय मिटिंग झाल्या होत्या, ते. कारण त्या मिटिंगांमध्ये उदय सामंतदेखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये ॲडमीट असताना योगेश कदम यांना संपविण्यासाठी कसं कटकारस्थान चाललं होतं, ते सामंत १९ तारखेला सांगणार आहेत. स्वतःच्याच आमदारांना संपविण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आमदार, नेते यांना संपविण्याचे पाप करताय आणि दुसऱ्याला गद्दार म्हणताय. योगेश कदमांना संपविण्यासाठी अनिल परब, अजित पवार हे संजय कदम यांना पाच-पाच, दहा दहा कोटींची काम देत होते, असा आरोपही रामदास कदम यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com