Ramdas Kadam, Anil Parab
Ramdas Kadam, Anil Parab Sarkarnama
मुंबई

Ramdas Kadam : परबांना ED लागली पाहिजे ; त्यांची जागा जेलमध्येच..

सरकारनामा ब्युरो

Ramdas Kadam : राज्यात शिंदे विरुद्ध ठाकरे गट संघर्ष होत असतानाच कोकणात ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब आणि शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सगळ्यांना माहित आहे. आज पुन्हा रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला.

कोकणातील साई रिसॉर्ट प्रकरणामुळे माजी मंत्री अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. या विषयावरुन कदम यांनी त्यांच्यावर टीका केली. रामदास कदम म्हणाले, "

कोकणातील साई रिसॉर्ट प्रकरणामुळे माजी मंत्री अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. या विषयावरुन कदम यांनी त्यांच्यावर टीका केली. रामदास कदम म्हणाले, "

'अनिल परब ही विश्वासघाती माणसं आहे, हे उद्धव ठाकरेंचे चमचे आहे, बडवे आहे. अशा लोकांची लवकर चौकशी झाली पाहिजे. चौकशीमध्ये सापडला तर आतमध्ये गेला पाहिजे अनिल परब हा उद्धव ठाकरेंचा चमचा आहे," अशा शब्दात रामदास कदमांनी परबांना हल्लाबोल केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

कदम म्हणाले, "अनिल परब हा बेईमान माणूस आहे.त्यांना लवकर ED लागली पाहिजे. लगेच हा माणूस जेलमध्ये गेला पाहिजे, अशा माणसाचे काम हे जेलमध्येच आहे. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे बडवे आहेत. आमदार योगेश कदम यांच्या विरोधात त्यांनी कामा केले केले, त्यांची जागा ही जेलमध्येच आहे," अनिल परबांनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली आहे, त्यांची ईडीने चौकशी केली पाहिजे, असे रामदास कदम म्हणाले.

रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम (Yogesh Kadam Accident)यांच्या गाडीला काल (शुक्रवारी) रात्री अपघात झाला आहे. रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे हा अपघात झाला आहे.

त्यांच्या कारला डम्परने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. ते खेडहून मुंबई येत होते. "आई जबदंबेच्या कृपेने सुखरुप आहे," अशी भावना योगेश कदम यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT