shiv sena bhawan
shiv sena bhawan  sarkarnama
मुंबई

शिवसेना भवनासमोर भोंग्यावर हनुमान चालिसा ; मनसेनं डिवचलं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''मशिदीवरील भोंगे राज्य सरकारनं हटवावे, नाहीतर मनसे कार्यकर्ते ते हटवतील. त्याविरोधात हनुमान चालीसा पटण देखील केले जाईल,'' असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी शिवाजी पार्कच्या सभेत म्हटलं होत. त्यानंतर मनसेनं मुंबईत हनुमान चालीसा लावण्यास सुरवात केली आहे, आज रामनवमीनिमित्त (ramnavami)मनसेने शिवसेना भवनासमोर (shiv sena bhawan) हनुमान चालिसा लावली.

आज सकाळी मनसेने शिवसेना भवनासमोर एका रथात भोंगा लावून हनुमान चालिसा लावला होता, शिवसेनेला डिवचण्यासाठी मनसेचा हा प्रयत्न आहे, त्यावर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली आहे. मनसेनं लावलेले भोंगे पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj Thackeray)यांनी मशिदीवरच्या भोंगावर केलेल्या विधानावर पुण्यात मनसेमध्ये (mns)दुफळी निर्माण झाली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. तीन दिवसात तीन बड्या नेत्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या त्या विधानावर भाष्य केलं आहे. पवारांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

केज तालुक्यातील येडेश्वरी कारखान्यातील आसवानी प्रकल्पाचे उद॒घाटन काल पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ''राज्यात कोळशाचा तुटवडा असल्याने वीज भारनियमन करावे लागत आहे. आता रामनवमी, हनुमान जन्मोत्सव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह रमनाज महिना सुरु आहे. आनंदाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात असताना राज्याच वातारण गढूळ करण्याचे काम सुरु आहे. आता भोंगे बंद करा म्हणण्याचे कारण काय,'' असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

राज ठाकरे (Raj Thackeray)यांची १२ एप्रिल रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतनजवळ सायंकाळी 6.30 वाजता होणार असल्याचे मनसेने जाहीर केले आहे. सभेपूर्वी मनसेकडून एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक टि्वट करुन या सभेचा टीझर रिलीज केला आहे.

मनसेच्या शेअर केलेल्या टीझरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांनी केलेल्या प्रतिक्रिया दाखविल्या आहेत. या सर्व टीकांना राज ठाकरे करारा जबाब देणार असं म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT