पवारांनी तुम्हाला मोठ केलं, तुम्ही काय मूळचे भाजपवाले आहात का ; राऊतांनी सुनावलं

ते हल्ल्याचं समर्थन करत होते. हा हलकटपणा.
Sanjay Raut, Udayanraje Bhosale
Sanjay Raut, Udayanraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाविषयी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांना विचारले असता त्यांनी काल पवारांवर हल्लाबोल केला. उदयनराजे भोसले यांनी या आंदोलनाबाबत सूचक प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेचा समाचार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतला.

उदयनराजे म्हणाले, “या जन्मी आपण जे कर्म करतो, ते याच जन्मी फेडावं लागतं. सगळ्यांना हे लागू होतं. अपवाद कुणाचाही नाही. अजून काय बोलणार त्यावर.'' संजय राऊत म्हणाले, ''काल ज्या भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या ते कालपर्यंत राष्ट्रवादीत होते. ते भाजपमध्ये गेले, पवारांविरोधात बोलत होते. हल्ल्याचं समर्थन करत होते. हा हलकटपणा आहे. पवारांनी मोठ केलं, तुम्ही काय मुळचे भाजपवाले आहात काय?

Sanjay Raut, Udayanraje Bhosale
Silver Oak Attack:बारामतीत गोविंदबागेसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त

''पवारांच्या घरासमोर घडलेला प्रसंग हे आंदोलन नव्हते, हा हल्ला होता. या हल्ल्याचे समर्थन विरोधी पक्षातील लोक करत होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेतेच समर्थन करते होते,'' असे राऊत म्हणाले. पवारांची भेट घेतल्यानंतर राऊत माध्यमांशी बोलत होते.

''शरद पवार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी फंडिग केलं जात आहे. विरोधीपक्षाचा हा दळभद्रीपणाचा कळस आहे. यामुळे ते ठाकरे सरकारला अडचणीत आणू शकत नाही, त्यांची बेअब्रु होईल. शिवसेना ही नेहमीच कामगारांच्या पाठिंशी आहे,,'' असे राऊत म्हणाले. ''संपकऱ्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी एकाच वेळी प्लॅटफॅाम तिकीट कुणी दिले,'' असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

Sanjay Raut, Udayanraje Bhosale
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे भाजपच ; राऊतांचा गंभीर आरोप

''एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर दोन दिवसांनी या हल्ला झाला आहे, एकीकडे गुलाल उधळला, तर दुसरीकडे हल्ला करतात, एस.टी कर्मचाऱ्यांना कुणीतरी भडकवलं असावं, माध्यमांना माहिती मिळते, पण पोलिसांना का मिळत नाही,'' असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com