Narayan Rane | PM Narendra Modi|
Narayan Rane | PM Narendra Modi| 
मुंबई

राणे म्हणतात, पंतप्रधान मोदी बोलतात तेव्हा त्यांच्याकडं बघतचं बसावसं वाटतं...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आता जागतिक कीर्तिचं व्यक्तिमत्व झाले आहेत. संपूर्ण जगात त्यांचं कौतुक होतंय. कॅबिनेटमध्ये बसतो तेव्हा सर्व गोष्टी त्यांना माहित असतात. ते जेव्हा बोलत असतात तेव्हा त्यांच्यांकडे बघतच बसावसं वाटतं. अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं आहे. ते मुंबई त बोलत होते.

यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे शिवसेनेवरही टीका केली. "उगवत नाही, फुलत नाही, वास येत नाही, असा चाफा मातोश्रीवर आहे, कार्यक्रमाच्या सत्कार करताना मला पुरुषार्थ हे पुस्तक दिलं. पण हे पुस्तक मला नाही उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) द्यायला पाहिजे, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली.

अडीच वर्ष काय त्यांनी राज्यात कोणती योजना राबवली, दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी त्यांनीकाय केलं, बेकारीसाठी काय केलं? असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला. पण आता रोज फक्त शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे पण मी सांगेन की उत्तरे देऊ नका, आपला वेळ वाया घालवू नका, कामं करा, असा सल्ला नारायण राणेंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. साहेब हे साहेब होते. साहेबांच्या नखाची सर देखील यांना नाही. काय म्हणू यांना, कोळसाही म्हणू शकत नाही, अस टोलाही त्यांनी लगावला.

17 सप्टेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा वाढदिवस झाला. भाजपने त्यांचा वाढदिवस एक दिवस नाही तर 15 दिवस विविध माध्यमातून साजरा केला. मला केंद्रात मंत्री होऊन एक वर्ष झालं. या एका वर्षात मी सव्वा लाख उद्योजक तयार केले. महाराष्ट्रात मी 60 टक्के ठिकाणी जाऊन आलोय, असंही मंत्री राणेंनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT