..तर मग राष्ट्रवादी-दाऊद गॅंग संबंधांचीही चौकशी व्हावी: संघावरील बंदीच्या मागणीवर भाजप आक्रमक

RSS| BJP| पीएफआयवरील बंदीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालावी, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.
RSS| BJP|
RSS| BJP|
Published on
Updated on

मुंबई : देश विघातक कृत्याप्रकरणी केंद्र सरकारने पीएफआयवर बंदी घातली. या बंदीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालावी, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. या मागणीवरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि भाजप (BJP) पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरएसएसवर बंदी घालण्याच्या मागणीवर सुप्रिया सुळेंनी दिलेल्या प्रतिक्रीयेनंतर भाजपने थेट राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने पीएफआयवर लावलेल्या बंदीचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणी मागणी असेल तर या मागणीवर चर्चा व्हायला हवी. कुठलीही गोष्ट करताना समाजात त्याची चर्चा झाली पाहिजे. देशात ज्या काही गोष्टी होतील, त्या संविधानाच्या चौकटीत राहून केल्या पाहिजे. सर्वांना समान न्याय दिला पाहिजे'', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती.

RSS| BJP|
MNS : नागपूर शहरात मनसे नियुक्त करणार १५६ शाखाध्यक्ष

यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चौकशीची मागणी केली आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस आणि दाऊद गँगच्या संबंधांची चर्चा झाली पाहिजे... आणि कारवाई सुध्दा. तीन प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दाऊद टोळीशी संबंध उघड झाला आहे. त्यांच्या सूत्रधाराचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.

गेल्या आठवड्याभरात राष्ट्रीय तपास यंत्रणांनी एकाच वेळी देशभरात अनेक ठिकाणांवर छापेमारी करत पीएफआयचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. यानंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास यंत्रणांनी गृहमंत्रालयाला अहवाल सादर करून पीएफआय संघटनेवर बंदी घालण्याचीही मागणी केली. पीएफआकडून २५ वर्षात देशाला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा कट रचला जात असल्याचे काही पुरावे मिळाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. यासोबतच देशात अनेक ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्यांमध्येही पीएफआयचा सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याचे यंत्रणांनी म्हटलं. यानंतर अखेर पीएफआयवर बंदी घालण्यात आली. या बंदीनंतर आरएसएस वरही बंदी घालण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com