Mumbai News, 20 Apr : निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले हा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. एकामागून एक धक्कादायक दावे तो करत आहेत. सुरूवातीला वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी आपणाला ऑफर होती, असा खबळजनक दावा केल्यानंतर तो चर्चेत आला.
त्यानंतर निवडणुकीत ईव्हीएम पासून दूर राहण्यासाठी धनंजय मुंडेंच्या माणसाने आपणाला 10 लाख रुपये दिल्याचा दावाही त्याने केला होता. अशातच आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
ॲक्सिस बँकेत अमृता फडणवीस काम करतात. त्यामुळे प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला त्यांचं अकाऊंट ॲक्सिस बँकेतच काढण्यासाठी धमकावलं जातं, असा गंभीर आरोप कासलेने केला आहे. शिवाय प्रत्येक अकाउंटमागे त्यांना 300 रुपये मिळतात. त्यामुळे दोन लाख पोलिसांसह इतर पोलिस अधिकारी पकडून 3 ते 4 लाख अकाउंट सहज होतात.
या सर्व अकाउंटचे 300 रुपयाप्रमाणे त्यांना किती पैसे मिशत असतील, याचा विचार करा. जवळपास त्यांना दहा कोटी त्यांना मिळतात आणि याला पुराव्याची गरज नाही. हे जनतेला समजू शकते. मला याबद्दल खुलासा करायचा होता, असं कासले याने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, ज्या व्हायरल व्हिडिओतून कासले याने आरोप केले आहेत. तो व्हिडिओ एका वकील महिलेने अमृता फडणवीस यांना टॅग करत खुलासा मागितला होता. त्यांच्या याच ट्विटला रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ज्यामध्ये त्यांनी ट्विट टॅग करणाऱ्या महिलेला उद्देशून तुम्ही चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहात? तुम्ही माझ्यावर पोलिसांच्या अकाऊंटसाठी ॲक्सिस बँकेकडून प्रत्येकी 300 रुपये घेतल्याचा आरोप करत आहात? तुमच्या या खोट्या राजकीय अजेंड्यात मला का ओढत आहात? असा सवाल करत मुंबई पोलिसांनी कृपया या प्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती केली आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.