Deepak Kesarkar Sarkarnama
मुंबई

Deepak Kesarkar News : रश्मी ठाकरे अन् आदित्य ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटले; केसरकरांचा खळबळजनक दावा

Rashmi Thackeray, Aaditya Thackeray Meet Amit Shah : मोदींच्या भेटीचा ठाकरे गटाकडून इन्कार केलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपशी घरोबा करण्याच्या तयारीत?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुका जवळ येतील तशा राज्यासह देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच विविध राजकीय पक्षातील अनेक दिग्गज मंडळी भाजपमध्ये दाखल होण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसून येत आहे. अशातच महायुतीतील शिवसेनेचे नेते, मंत्री दीपक केसरकरांनी खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, असे केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

जागावाटपच्या चर्चेपूर्वी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांकडे निवडणूक झाल्यानंतर भाजपसोबत जाणार नाही ना याची हमी मागितली आहे. तसेच प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्यांचा हवाला देत केसरकरांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) भेटी घेतल्याचे सांगितले. मोदींच्या भेटीचा कुणाकडूनही इन्कार केलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपशी घरोबा करण्याच्या तयारीत आहेत, असा दावाही केसरकरांनी केला आहे.

केसरकर म्हणाले, दिल्लीत जाऊन रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि आदित्य हे नरेंद्र मोदींना भेटले आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेला प्रश्न योग्यच आहे. आंबेडकरांच्या प्रश्नाला ठाकरे आणि पवारांनी उत्तरे द्यावीत. त्यामुळे शिवसैनिकांनी सावध व्हावे. राज्यात महायुती होणार होती. तेच ठाकरे ठरवून आले होते. मात्र दोनवेळा त्यांनी शब्द फिरवून पंतप्रधान मोदींना फसवले. आता मोदींनी त्यांना जवळ घ्यावे की नाही, हा त्यांचाच प्रश्न आहे. मात्र या भेटीतून सर्वांना वस्तुस्थिती समजली, असेही केसरकर म्हणाले.

दरम्यान, 2019 मध्ये अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला भाजप नाकारत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. त्यानंतर भाजपने युती तोडल्याचाही आरोप करून ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाण्याची शक्यता असल्याचे विधान केसरकरांनी केले आहे. केसरकरांच्या वक्तव्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. केसरकरांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT