Amit Shah News : महाराष्ट्रात येऊन अमित शाहांचं पवारांना चॅलेंज; म्हणाले, 'त्यांनी 50 नाहीतर अवघ्या 5 वर्षांचा...'

Sharad Pawar, Uddhav Thackeray, Sonia Gadhi : राज्यातील महाविकास आघाडीचे तीनही टायर पंक्चर झाले आहेत. आघाडीतील सर्व नेते आपल्या कुटुंबाला मोठे करण्यासाठी एकत्र आलेले आहेत.
Amit Shah, Sharad Pawar
Amit Shah, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सर्व परिवारवादी एकत्र आले आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांत देशात जो विकास झाला तो गेल्या 70 वर्षांत झाला नाही. राज्यातील मोठे नेते आपल्या मुलांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी धडपडत आहेत. भाजप मात्र सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवारांना ओपन चॅलेंज दिले.

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या शाह यांनी जळगाव (Jalgaon) येथे युवकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी काँग्रेससह शरद पवारांना लक्ष्य केले. शाह म्हणाले, गेली 50 वर्षे महाराष्ट्र शरद पवारांना सहन करत आहे. मी गेल्या दहा वर्षांचा हिशेब देतो. तसा पवारांनी गेल्या 50 वर्षांचा नाही, तर फक्त पाच वर्षांचा हिशेब द्यावा, असे आव्हानही शाह यांनी या वेळी केले. (Latest Political News)

Amit Shah, Sharad Pawar
NCP Politics : अजितदादा म्हणतात आम्ही पुन्हा कधीही एकत्र येणार नाही; तर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'आमच्यातील मतभेद हे...'

अटल बिहारी वाजपेयी सत्ता सोडताना देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर होती. त्यानंतर दहा वर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेसच्या काळातही त्या क्रमांकात सुधारणा झाली नाही. मात्र, मोदी सरकारच्या दहा वर्षांत अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली. आता नरेंद्र मोदींना (Narendra Modi) तिसऱ्यांदा संधी दिली तर हा क्रमांक तीनवर आणण्याची गॅरंटी देतो, असा शब्दही शाह यांनी दिला.

शाहांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेत्या खासदार सोनिय गांधी, राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे तीनही टायर पंक्चर झाले आहेत. आघाडीतील सर्व नेते आपल्या कुटुंबाला मोठे करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. उद्धव ठाकरेंना आदित्यला, पवारांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे. तर सोनिया गांधींना राहुल यांना पंतप्रधान करायचे आहे. पण तुमच्यासाठी कोण आहे? असा प्रश्न उपस्थित करत मतदान करताना उमेदवारांचा बायोडाटा तपासूनच मतदान करा, असे आवाहनही शाह यांनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Amit Shah, Sharad Pawar
Rahul Gandhi : भाजप कार्यकर्त्यांनी चक्क बटाटे भेट, राहुल गांधींचेही हटके उत्तर; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com