Nawab Malik,Sanjay Raut, anil deshmuk Latest News sarkarnama
मुंबई

राऊत तुरूंगाबाहेर.. देशमुखांना दिलासा आता मलिकांना जेल की बेल?

Nawab Malik : नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर उद्या फैसला...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर उद्या मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यांना जेल की बेल याचा उद्या (ता. ३० नोव्हेंबर) फैसला होणार आहे.

दरम्यान, या आधी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील जामीन मिळाला आणि ते तुरूंगाबाहेर आले आहेत.आता नवाब मलिकांना उद्या दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Nawab Malik, Sanjay Raut, anil deshmuk Latest News)

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामीन अर्जावर उद्या मुंबई सत्र न्यायालयात निर्णय होणार आहे. मलिक यांच्या अर्जावर दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश निर्णय देणार आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून ईडीने (ED) त्यांना महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि ते मंत्री असताना त्यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती.

मलिक सध्या कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापूर्वी मलिकांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणी अजून वाढणार हे पाहावे लागणार आहे. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिकांकडून करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळाला नाही.

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) हे ईडीच्या कचाट्यातून सुटले असून अनिल देशमुखांना देखील ईडीचा जामीन मिळाला आहे. आता मलिकांना देखील दिलासा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याना आहे. मात्र उद्या सत्र न्यायालय काय निर्णय देते हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT