Ravindra Chavan Sarkarnama
मुंबई

BJP Minister on Shivsena : भाजप मंत्र्याचे शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना खडेबोल; म्हणाले "टीआरपीचा खेळ..."

Kalyan Dombvali News : कल्याण-डोंबवलीतील भाजप-शिवसेनेतील शीतयुद्ध थांबले पाहिजे

शर्मिला वाळुंज

Ravindra Chavan on Shivsena : कल्याण-डोंबवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) शीतयुद्ध सुरू असल्याचे वारंवार समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये शिवसेनेचे काम करणार नाही, असा ठरावच मंजूर केल्याची माहिती समोर आली होती. त्यावर युतीसाठी आपली सर्व पदांचा राजीनामा देण्याची तयारी असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले होते. त्यानंतरही स्थानिक पातळीवरील शिवसेना-भाजपमधील कुरघोडीचे राजकारण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यावर भाजपच्या एका मंत्र्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. (Latest Marathi News)

डोंबिवली शेलार नाका परिसरात मंगळवारी मोदी @ 9 या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घरोघरी जावून नागरिकांची भेट घेत सरकारची कामांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कल्याण-डोंबवलीतील राजकारणावर बोलताना स्थानिक पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना व भाजप यांच्यातील कुरघोडी स्थानिक पातळीवर अजूनही सुरूच आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघावर दावा केला आहे. शिवसेनेच्या या कुरघोडीवर बोलताना भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कुणाचेही नाव न घेता शिवसेना पदाधिकाऱ्यांना फटकारले आहे.

यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, "कल्याण-डोंबवलीतील काही स्थानिक पदाधिकारी 'टीआरपी' कसा वाढेल त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसत आहे. त्यांनी मात्र आता 'टीआरपी'चा खेळ बंद केला पाहिजे. वरिष्ठ निर्णय घेतील तो प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मान्य करावा लागतो. शिवसेना-भाजप युतीमधील सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतले जातात. यामुळे यानंतर होणारा टीआरपीचा खेळ संपला, असे मी घोषित करतो."

कल्याण लोकसभेत शिवसेनेला सहकार्य न करण्याच्या ठराव केला आहे. या ठरावाबाबत वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेणार असल्याचेही यावेळी चव्हाण यांनी सांगितले. एनडीएचे उमेदवार कसे निवडून येतील याकडे लक्ष देणार असल्याचेही मंत्री चव्हाण स्पष्ट केले. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2024 मध्ये एनडीएचे सर्व उमेदवार जिंकून आणणे, त्यानंतर शिवसेना भाजप-युतीचे सर्व उमेदवार जिंकून आणणे ही आमची प्राथमिकता आहे. मात्र सर्व ठिकाणी टीआरपीचा खेळ सुरू झाला आहे. तो आता थांबवावा."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT