Uddhav Thackeray Replied Devendra Fadanvis: 'मी अर्धवटराव तर मग फडणवीस दिल्लीश्वरांचे आवडाबाई आहेत का?'; उद्वव ठाकरेंचा पलटवार पलटवार

भाजपने मुंबई महापालिकेत केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांनाही उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Uddhav Thackeray Replied Devendra Fadanvis:
Uddhav Thackeray Replied Devendra Fadanvis:Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Replied Devendra Fadanvis : ''जर मी अर्धवटराव आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीश्वरांची आवडाबाई आहेत का,'' अशा शब्दातं उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपने मुंबई महापालिकेत केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांनाही उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

तुम्हाला नोटीस आल्यानंतर तुम्ही दिल्लीत जाऊन केंद्रीय गहमंत्री अमित शहांना (Amit Shah) भेटले असल्याचा आरोप भाजपने केला होता.या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, मिंधे सातत्याने दिल्लीला का जातात, शिंदेंना रोज नोटीसा येत असतील म्हणूनच ते दिल्लीला जात असतील, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray Replied Devendra Fadanvis:
Devendra Fadnavis News : '..अर्धवटराव, स्क्रिप्ट रायटर बदला' ; फडणवीसांचा ठाकरेंवर खोचक निशाणा !

फडणवीस म्हणाले की मोदीजींनी लस तयार केली नसती तर... मोदींजींनी कधी लस तयार केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याच मुद्द्यावरुन ते मला अर्धवटराव म्हणाले, मला अर्धवटराव म्हणत असतील तर ते दिल्लीश्वरांचे आवडाबाई आहेत का, अर्धवटराव आणि आवडाबाई अशी दोन पात्र होती. मग ते फडणवीस (Devendra Fadanvis) आवडाबाई आहेत का, पण आता तेही नावडाबाई झाले आहेत. 'मोदींजींनी लस तयार केली' या वाक्याला काही अर्थ आहे का, कोणत्या जगात राहताय, तुम्ही लोकांना मुर्ख समजता का, असा सवालही त्यांनी फडणवीसांना केला आहे.

कोरोना काळात मी मुख्यमंत्री असताना १७ कोटींच्या लसीची गरज होती. मी म्हणाले होतो. मी एक रकमी चेक देतो. आम्हाला लसी द्या पण केंद्र सरकारकडून या लसी देण्यात आल्या नाहीत. आम्ही केंद्र सरकारला दोष दिले नाही. असंही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) यावेळी नमुद केलं.

Uddhav Thackeray Replied Devendra Fadanvis:
Pune Crime News : धक्कादायक! एमपीएसीत सहावी आलेल्या युवतीचा संशयास्पद मृत्यू; राजगडाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह

मुंबई महापालिकेतील ९२ हजार कोटींच्या ठेवी आहेत, या ठेवीतील ७-८ हजार कोटींची उधळपट्टी पैसे केल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकार त्या ठेवी लुटत असल्याचा असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसेच, मुंबई महापालिकेतील कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला होता. पण बीएमसीतील हवे ते घोटाळे बाहेर काढा, आम्ही घाबरत नाही. असही उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com