Ravindra Waykar In Shivsena  Sarkarnama
मुंबई

Ravindra Waykar In Shivsena : ठाकरेंचा आणखी एक ताकदवान आमदार फुटला? रवींद्र वायकर शिंदेंच्या गळाला?

Shiv Sena News : "रवींद्र वायकर हे तपास यंत्रणांच्या रडारवर होते..."

Chetan Zadpe

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. सायंकाळी आठच्या दरम्यान ते वर्षा निवासस्थानी दाखल होऊन शिवसेनेत प्रवेश करू शकतात. एका मराठी वृत्तनाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल पश्चिम उपनगराच्या दौऱ्यावर असताना जोगेश्वरीच्या शिवसेना शाखेत गेले होते. यावेळी ठाकरे यांचे स्वागत करताना वायकर यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. मात्र आता वायकरांचा शिंदे यांच्या शिवसेनेते तातडीने प्रवेश करण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावरती आहेत. हा दौरा आटोपून मुख्यमंत्री शिंदे आज सायंकाळी मुंबईत दाखल होतील. मुंबईत आल्यानंतर शिंदे यांच्या उपस्थितीत वायकरांचा पक्षप्रवेश होईल, असे सांगण्यात येत आहे. यामुळे ठाकरेंना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे मागील आनेक दिवसांपासून वादात सापडले होते. तपास यंत्रणांच्या रडारवर वायकर होते. जोगेश्वरी पश्चिम उपनगर येथील ते आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाने एक मोठी ताकद एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) सोबतीला जोडली जाईल. गजानन किर्तीकर हे स्थानिक खासदार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने वायकरांसोबत काही स्थानिक नगरसेवक ही येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT