Jyoti Waghmare and Sushma Aandhare Sarkarnama
मुंबई

Jyoti Waghmare News : ''एल्विश यादव हा काही आमचा जावई नाही'' - ज्योती वाघमारे विरोधकांवर कडाडल्या!

Sushma Aandhare : ''अब्रू आपल्याच अंगणात पिकते आणि आपणच अब्रूचे...'' सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांना टोला!

Mayur Ratnaparkhe

Elvish Yadav Case : एल्विश यादव प्रकरणावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. पाच जिवंत कोब्रा साप आणि बंदी घालण्यात आलेले विष एल्विश यादवच्या घरात सापडल्याने तो अडचणीत आला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

याशिवाय गणेशोत्सव काळात एल्विशची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हजेरी लावली हाेती. तिथे त्याच्या हस्ते गणेशाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आरतीही केली गेली होती. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, '' अब्रू आपल्याच अंगणात पिकते आणि आपणच अब्रूचे ठेकेदार आहोत. अशा तोऱ्यामध्ये वावरणारे सत्ताधाऱ्यांचे मंत्री आणि आमदार. या सगळ्यांना म्हणजे या गोष्टीची शंका कधी त्यांच्या मनात निर्माण होते का? असे काही प्रश्न त्यांना पडतात का, की काय असं घडतं बरं की दरवेळी अशी काही लोकं तुमच्याच सोबत दिसतात.''

याशिवाय ''गर्दीत फोटो काढणं मी समजू शकते. गर्दीत कुणीही कुणासोबत फोटो काढू शकतं. पण शासकीय बंगल्यावर आरती करायला लोक येतात. याचा अर्थ काय? आरतीच करायची असेल तर आमच्या मनोज जरांगेंसारख्या लोकांना जे समाजहितासाठी आपला जीव धोक्यात घालतात. अशा लोकांच्या हस्ते आरती करा,'' अशा शब्दांमध्ये सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.

ज्योती वाघमारे काय म्हणाल्या? -

दुसरीकडे शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनीही सत्ताधारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या, ''मला सांगा की आतापर्यंत वर्षा बंगला हा केवळ व्हीयआपींसाठी राखीव होता. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात घडलं. की गणोशोत्सवास वर्षा बंगला सर्वसामान्यांसाठी खुला केला गेला आणि त्यावेळी दररोज दहा-पंधरा हजार भाविक तिथे येत होते.''

याशिवाय ''आरोप करणाऱ्या विरोधकांना फक्त एल्विश यादव दिसतो, इर्शाळवाडीची अनाथ मूलं नाही दिसली? त्यांना ते ज्येष्ठ नागरिक नाही दिसले, जे तिथे अथर्वशीर्ष पठण करत होते आणि त्या सगळ्या गर्दीच्या मध्ये जो कोणी येऊन गेला, मला ठणकावून इथे सांगायचं आहे, की एल्विश यादव हा काही आमचा जावई नाही,'' अशा शब्दांमध्ये वाघमारे यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT