Rebel MLA Prakash Abitkar-Eknath Shinde
Rebel MLA Prakash Abitkar-Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

बंडखोर आमदारांना खूष ठेवण्याचा एकनाथ शिंदेंचा प्लॅन; निधीवाटपाची कोटीच्या कोटी उड्डाणे!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर मतदारसंघातील विकास कामे मार्गी लागावीत; म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदारांकडून पत्र मागवली आहेत. मतदारसंघातील उर्वरीत कामांची पत्र घेऊन एकनाथ शिंदे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर येत आहेत. बंडखोरांना त्यांची बक्षिसी आणि खूश ठेवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होताना दिसत आहे. (Rebel MLA arrives at CM's bungalow with letter of development work)

जिल्हा नियोजन निधी थांबवल्यानंतर आपल्या आमदारांची विकास कामे मार्गी लागावीत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र मागवली आहेत. कोल्हापूरचे शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश आबीटकर यांनी आपल्या मतदारसंघातील कामासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सूपूर्त केले आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी माजी मंंत्री आणि बंंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील सूत गिरणीचा जवळपास ५० कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली होती.

त्यानंतर आमदार कोरेगावचे बंडखोर आमदार महेश शिंदे यांनाही तब्बल २० कोटींचे रिटर्न गिफ्ट मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या कोरेगाव नगरपंचायतीसाठी विशेष बाब म्हणून २० कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेश शिंदे यांना दिले आहे. त्याचप्रमाणे इतरही बंडखोर आमदारांची कामे करण्यास मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य दिले आहे. यामध्येही शिवसेनेच्या काही खासदारांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र दिले आहे.

दरम्यान, आमदार संतोष बांगर हे आपल्या समर्थकांसह आज मुंबईत आले होते. त्यांचीही कामे मार्गी लावण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, संतोष बांगर आणि सर्व पदाधिकारी इथे आले आहेत. त्यांची शक्ती किती आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांची विकासकामे प्रश्न असतील त्यांना आम्ही मदत करू. हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा गट आहे. ज्यांना हिंदुत्वाची भूमिका पटत आहे, ते सोबत येत आहेत. विकास कामे राज्य सरकार कुठेही प्रलंबित ठेवणार नाही. शिवसेना आणि भाजप युतीचं हे सरकार विकास कामं करील.

ज्यांना आमचे विचार पटलेले आहेत, त्यांना आमच्यासोबत काम करायचं आहे, ते माझ्या संपर्कात आहेत. तसेच, राष्ट्रपतीपदासाठी एक आदिवासी महिला उमेदवार आहे आणि आमचं समर्थन त्यांना आहे. सर्व खासदारांचं देखील हेच म्हणणं आहे की आदिवासी समाजाला न्याय द्यायचा आहे. या समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही केला आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT