पिंपरीः भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी पिंपरी-चिंचवडचा नुकताच (ता.६) दौरा केला. त्यांच्या समजावणीनंतरही पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (pcmc)सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचे राजीनामे सत्र सुरुच आहे. गुरुवारी (ता.९) त्यात दोनने भर पडली.
राजीनामा दिलेल्या भाजप नगरसेवकांची संख्या ही गेल्या तीन आठवड्यात सहा झाली आहे. पाच दिवसांपूर्वीच (ता.४) भाजपच्या माया बारणे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे राजीनामे सुरु झाल्याने भाजप काहीसा अडचणीत आला आहे.
गतवेळी २०१७ ला बिनविरोध भोसरीतील प्रभागातून (क्र. ६ क) निवडून आलेले भाजपचे निष्ठांवत रवी लांडगे व शहर कारभारी भाजप आमदार महेश लांडगेंच्या याच मतदारसंघातील भाजपचेच दुसरे नगरसेवक संजय नेवाळे (प्रभाग क्र.११ क) यांनी थोड्या वेळापूर्वी पालिका आय़ुक्त राजेश पाटील यांच्यांकडे आपले राजीनामे दिले. रवी लांडगे यांनी नुकताच (ता.५) पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तो देताना त्यांनी आ. लांडगे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आऱोप केले होते. त्याला अद्याप उत्तर आलेले नाही. दरम्यान, आज राजीनामा दिलेले दोघेही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत राजीनामे दिलेल्या सहापैकी तीन-तीन नगरसेवक हे शहराचे दोन्ही भाजप कारभारी आमदारांच्याच (भोसरीचे महेश लांडगे आणि चिंचवडचे लक्ष्मण जगताप) मतदारसंघातील आहेत. चंदा लोखंडे यांचा अपवाद वगळता बाकीच्यांना गेल्या पाच वर्षात कुठलेही पद मिळालेले नव्हते. त्या नाराजीतून पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर आरोप करीत त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यातील वसंत बोराटे यांनी,तर राष्ट्रवादीत प्रवेशही केला आहे. बाकीचेही त्याच मार्गावर आहेत.
भाजपच्या नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुरवातच भोसरीतून झाली. बोराटे यांनी गेल्या महिन्यात १६ तारखेला तो दिला. त्यानंतर चिंचवडमधील लोखंडे यांनी २१ तारखेला,तर याच याच मतदारसंघातील तुषार कामठे यांनी २४ तारखेला नगरसेवकपदाचे राजीनामे दिले.बारणे यांनी तो या महिन्यात नुकताच (ता.४) दिला.५ तारखेला रवी लांडगे यांनी पक्ष सोडल्यानंतर ते सुद्धा नगरसेवकपदाचा राजीनामा देणारच हे स्पष्ट झाले होते.तो त्यांनी आज नेवाळेंना बरोबर घेऊन देत भाजपला डबल धक्का दिला. रवी लांडगे हे भाजपला शहरात नावलौकीक करून देणारे, भोसरी हा पक्षाचा बालेकिल्ला केलेले पक्षाचे स्वर्गीय अध्यक्ष अंकुश लांडगे यांचे सख्खे पुतणे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.