मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या (Pravin Chavan) माध्यमातून भाजपच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, याचा संपूर्ण लेखाजोखाच मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल फडवणीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत 'पेनड्राईव्ह' बॉम्ब टाकला. त्याला राऊत 'पेनड्राईव्ह'नेच उत्तर देणार आहेत.
''हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असल्याचे आणि सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत असल्याचा गंभीर, स्फोटक आरोप फडणवीसांनी पुराव्यांसह केला.
राऊत म्हणाले, ''फडणवीसांनी केलेल्या आरोपांचे स्क्रिप्ट कोणी लिहिलेला आहे. भाजपाचे सलीम-जावेद कोण आहेत, त्यातली पात्र कोण आहेत, नेपथ्य कोणाचं आहे, दिग्दर्शन कोणाचं आहे, त्याच्या खोलाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेन ड्राइव्ह घेऊन समोर येईल,''
राऊत म्हणाले, ''आरोप करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे. पण असे कुंभांड रचण्याचे काम महाराष्ट्राचे पोलिस करणार नाहीत, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले आहेत. महाराष्ट्राचे पोलीस असे कधी करायचे नाही, महाराष्ट्राच्या पोलिसांना एक चांगलं प्रशिक्षण आहे. राज्याच्या पोलिसांना यासाठी प्रतिष्ठा आहे की ते खोट्या दबावाखाली कारवाया करत नाहीत. त्यांना कुंभांड करायचं असेल तर त्यासाठी आम्हाला त्यांना ईडी आणि सीबीआयकडे पाठवावा लागेल,''
''खोटे पुरावे खोटे साक्षीदार कसे उभे करायचे हे केंद्रीय तपास यंत्रणांचे काम आहे. पुरावे सादर करायला अभ्यास किंवा संयम लागत नाही ती तेवढ्यापुरती सळसळ असते आणि खळबळ असते. खळबळ माजवन हाच जर हेतू असेल विरोधी पक्षाचा, तर ती खळबळ देखील माजलेली नाही,'' असे राऊत म्हणाले.
''काल मी जी ईडीवर पुराव्यासह काही आरोप केले आहेत, ते खळबळजनक आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा मुंबई आणि महाराष्ट्रात काय काम करत आहेत त्यांच्या खंडणीखोरीची प्रकरणे समोर आलेली आहेत, त्यावर फडणवीस का बोलत नाहीत राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाईंचा अपमान केला त्यावर काही भूमिका घेतली असती तर त्यांच्या कालच्या पेन ड्राईव्हला काही महत्त्व आलं असतं तुम्ही एकतर्फी काम करीत आहात. विरोधी पक्षनेता हा राज्याच्या जनतेची भूमिका मांडत असतो हे विरोधी पक्षनेते विसरलेले दिसत आहेत,'' असा टोला राऊतांनी लगावला.
''आमदार गिरीश महाजन यांना मोक्काच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी षडयंत्र रचले. खोटे पुरावे तयार केले. इतकेच नाही तर त्यांच्या टार्गेटवर मी स्वतः सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपतील इतर प्रमुख नेते होते,'' असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी मंगळवारी विधानसभेत केला. फडणवीसांनी याबाबतचे पुरावे सादर केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.