Nawab Malik Sarkarnama
मुंबई

नवाब मलिक म्हणतात, ''एकमेकांच्या हक्कांचा आदर करा''

राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) व राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी टि्वट करीत ''मानवी हक्कांचा आदर करा,'' असे आवाहन केलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : जगभरातील नागरिकांच्या मानवाधिकारांप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी 1950 पासून 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) व राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी टि्वट करीत ''मानवी हक्कांचा आदर करा,'' असे आवाहन केलं आहे.

आपल्या टि्वटमध्ये नवाब मलिक म्हणतात की, मानवी हक्कांचा आदर करणे हा आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे, आज, मानवी हक्क दिनानिमित्त, आपण एकमेकांच्या हक्कांचा आदर करण्याची आणि चांगल्या आणि अधिक शांततेच्या जगाकडे वाटचाल करण्याची शपथ घेऊ या. असे ट्वीट करत सर्वांनी मानवी हक्कांचा आदर करा.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत आजच्या दिनी मानवी हक्क अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या हक्कांबरोबरच इतरांच्या हक्कांबद्दल जागरूक राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे, त्यासाठी सर्वांनी संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.

मानवाधिकार हे वंश,लिंग,राष्ट्रीयत्व,भाषा, धर्म या कशाचाही भेदभाव न करता सर्व मानवांसाठी अंतर्भूत आहेत. मानवी हक्कांमध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क, गुलामगिरी व अत्याचार यांपासून मुक्तता, अभिप्राय आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, काम आणि शिक्षणाचा अधिकार असे इतर हक्क समाविष्ट आहेत. त्यामुळे जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ म्हणून साजरा केला जातो. असे ट्वीट खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.

या दिवसासाठी 10 डिसेंबर हीच तारीख निवडण्यामागचं कारण म्हणजे 1948 मध्ये याच दिवशी जगभरातल्या नागरिकांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेनं एक घोषणा पत्र जाहीर केलं होतं. हे घोषणा पत्र जगभरातल्या 500 पेक्षा जास्त भाषांत अनुवादीत आहे.

या वर्षीची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाची थीम 'Reducing inequalities and Advancing human rights' ही आहे. अर्थात असमानता कमी करणे आणि मानवी हक्क प्रगत करणे अशी ही थीम आहे. या वर्षीची थीम 'समानता' आणि UDHR च्या कलम 1 शी संबंधित आहे. ज्यात म्हटले आहे की 'सर्व मानव मुक्त आहे. त्यांच्या सन्मान आणि अधिकारांमध्ये समानता आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT