Priyanka Gandhi, robert vadra
Priyanka Gandhi, robert vadra sarkarnama
मुंबई

प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांना भाजपचा दणका ; आठ वर्षांनंतर कारवाई

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती रॉबर्ट वाड्रा (robert vadra) यांना हरियाणातील भाजप (BJP) सरकारने दणका दिला आहे. सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांनी भाजपने रॉबर्ट वाड्रा यांच्यावर कारवाई केली आहे.

वाड्रा यांच्या एका बांधकाम प्रकल्पाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. गुरुग्राम येथील स्काईलाइट हॅास्पिटालिटी प्रा. लि. या प्रकल्पाचा रियल एस्टेट परवाना भाजप सरकारने रद्द केला आहे. २००८ मध्ये हरियाणा येथे जेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते, तेव्हा रॉबर्ड वाड्रा यांना हा परवाना देण्यात आला होता. शहर नियोजन विभागाने वाड्राच्या या बांधकाम प्रकल्पावर कारवाई केली आहे.

परवाना रद्द करण्याबाबत आदेश ९ मार्च रोजी देण्यात आला होता. सन २०१२ मध्ये स्काईलाइटने व्यावसायिक वसाहत बनविण्याचा हा परवाना ५८ कोटी रुपयांना रियल एस्टेट कंपनी डीएलएफला (DLF) विकला होता. नियमांचे उल्लघंन करुन गुरुग्राम येथील वजीराबाद येथे DLFवर ३५० कोटींची जमीन विकल्याचा आरोप आहे. २०१२ मध्येही या जमीनीबाबत वाद निर्माण झाला होता. 15 आँक्टोबर 2012 रोजी स्काईलाइट के 3.35 एकरचा हा व्यवहार रद्द केला होता. यानंतर हा विषय चर्चेत आला.

हरियाणामध्ये 2014 मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर आता या कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. आता या जागेवर कुठलेही बांधकाम होणार नाही. हुड्डा सरकारने खूप कमी किमंतीत रॉबर्ट वाड्रा यांना ही जमीन दिली होती. त्यानंतर ही जमीन डीएलएफला विकण्यात आली होती. यात मोठा गैरव्यवहार झाला होता.

याबाबत हरियाणा सरकारने न्यायाधीश एस.एस.ढिंगरा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल यापूर्वीच सरकारकडे सूपूर्त केला होता. न्यायालयाने या अहवालाला सार्वजनिक करण्यावर बंदी घातली होती. स्काईलाइटने ही जमीन डीएलएफला विकल्यानंतर नवीन टायटल घेऊन सरकारकडे अर्ज दाखल केला होता.

2012 मध्ये हा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. २०१७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षीत होते. डीएलएफ हा परवाना पुन्हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. पण हा त्यांना यात यश मिळाले नाही. त्यांनी नवीन परवान्यासाठी अर्ज केला होता. पण तत्कालीन डीजी अशोक खेमका यांनी तो रद्द केला. त्यानंतर डीएलएफने स्थानिक प्रशासनाकडे याचिका दाखल केली होती. यात त्यांनी या रद्द केलेल्या परवान्याला आवाहन दिले होते.

वाड्रा यांची स्काईलाइट हॉस्पिटेलिटी ही कंपनी 2007 मध्ये एक लाख रुपयांवर सुरु होती. 2008 मध्ये स्काईलाइटने सेक्टर 83 मध्ये आंकारेश्वर प्रॉपर्टीजच्या माध्यमातून 7.5 कोटी रुपयांमध्ये 3.5 एकर जमीन खरीदी केली. या जमीनीला व्यावसायिक परवाना मिळताच स्काईलाइटने ही जमीन ५८ कोटी रुपयांना डीएलएफला विकली. याप्रकरणी वाड्रा आणि हुड्डा सरकारच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT