Rohit Pawar Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar : मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा स्वार्थी नेते; रोहित पवार असं का म्हणाले?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील 3.0 सरकारमध्ये राज्यातील सहा जणांची मंत्रि‍पदावर वर्णी लागली. यात मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या एका खासदाराचा सहभाग आहे. तर अजित पवार गटातील एकाही नेत्याचा समावेश नाही.

उपमुख्यमंत्री पवारांनी दोन दिवसांपूर्वी दोन मंत्रि‍पदाचा आग्रह केला होता. मात्र एक खासदार असलेल्या राष्ट्रवादीला राज्यमंत्री पदाची ऑफर दिली. ती राष्ट्रवादीने स्वीकारली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वार्थी नेते असल्याचा हल्लाबोल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केला आहे.

रोहित पवार Rohit Pawar म्हणाले, आता केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार बनत आहे. या सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. ते आपल्या खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यात यशस्वी झालेले आहेत. यासह ते आपापल्या राज्यासाठी काहीतरी मोठे पदरात पाडून घेण्याचाही प्रयत्नात आहेत. दुसरीकडे मात्र आपले नेते राज्यासाठी काहीच आग्रह धरताना दिसत नाहीत, याकडे पवारांनी लक्ष वेधले.

केंद्रात आपल्याला मंत्रिपद मिळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde, अजितदादा हे महायुतीतील नेते धडपडतात. ते मात्र राज्यासाठी काहीही मागताना दिसत नाहीत. ते फक्त आम्हाला मंत्रि‍पदे द्या, आमच्यामागे लावलेली ईडीची कारवाई थांबवा एवढीच मागणी करतात. हे नेते स्वार्थी आहेत. ते महाराष्ट्राच्या हिताची एकही मागणी करत नाहीत, हे राज्यासाठी दुर्दैवी बाब आहे, अशी खंतही रोहित पवारांनी व्यक्त केली.

Edited by Sunil Dhumal

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT