Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी(दि.२ जुलै) मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ,सुनील तटकरे यांच्यासह दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह मोठा गट त्यांच्यासोबत आहेत.
ज्यांना राष्ट्रवादीचे निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते असं म्हटलं जायचं त्यांनीही पक्षाची साथ सोडली. हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच एक व्हिडीओ टि्वट केला आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवारां(Rohit Pawar)नी ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिली आहे. सोशल मीडियावर पवारांचा तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 'वाट आहे संघर्षाची... म्हणून थांबणार कोण? सह्याद्रीसोबत आहे महाराष्ट्र सारा' अशा आशय त्या व्हिडीओ ट्विटसोबत आमदार रोहित पवारांनी लिहिलं आहे.
रोहित पवार काय म्हणाले...?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष झाल्यानंतर आता राज्यात दुसरा राजकीय बंड झालं आहे. हे बंड अजित पवार यांनी केले आहे. या बंडावर राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे. याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शरद पवारां(Sharad Pawar)च्या संघर्षाची गोष्ट शेअर केली आहे. आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
रोहित पवारांनी काय म्हटलंय..?
वाट आहे संघर्षाची...
म्हणून थांबणार कोण?
सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा
दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा...
मग संघर्षाला घाबरतंय कोण?
लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच...असा आशय ट्विटवरील व्हिडीओसोबत शेअर केला आहे. पवार घराण्यातील व्यक्ती असलेले रोहित पवार हे शरद पवारांच्या पाठीशी असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
हा व्हिडीओ गडी एकटा निघाला असं गाणं असलेला आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून आमदार रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारची भावनिक साद घातल्याचं सांगितल जातंय.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.