Maharashtra politics : शिंदे गटातील आमदारांनी शिऊन ठेवलेले कोट तसेच; घडले भलतेच : राष्ट्रवादीचेच झाले नऊ मंत्री

Eknath Shinde News : शिंदे सरकारचा शपथविधी झाल्यापासून शिवसेना शिंदे गटातील नेते मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले होते.
Eknath Shinde, Devendra Phadnis, Ajit Pawar News
Eknath Shinde, Devendra Phadnis, Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Rashtrawadi MLAs Oath Ceremony : महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 46 आमदारांना सोबत घेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीच्या नऊ ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिपदाची थपत घेतली. त्यामुळे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी मिळाली.

शिंदे सरकारचा शपथविधी झाल्यापासून शिवसेना शिंदे गटातील नेते मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले होते. अनेकांनी या संदर्भात आपली भावना बोलून दाखवली होती. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील आणि भाजपामधील (BJP) काही नेत्यांना संधी मिळेल, अशी चर्चा असताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांच्या इच्छेवर पाणी फेरले आहे.

Eknath Shinde, Devendra Phadnis, Ajit Pawar News
Pankaja Munde News: पंकजा मुंडे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर...?

शिंदे गटातील अनेक नेते मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. काही जणांनी तर शपथविधीसाठी कपडेही शिऊन घेतले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली आणि जी मंत्रिपदे शिंदे गटातील आणि भाजपामधील नेत्यांना मिळणार होती, ती मंत्रिपदे अजित पवार यांच्या गटाला मिळाली आहेत.

यामुळे शिंदे गटातील नेत्यांचा हिरमोड झाल्याचे सांगितले जात आहे. शिंदे यांच्यासोबत ४० आमदार, १३ खासदार आणि १० अपक्ष आमदार गेले आहेत. मात्र, सध्या शिंदे गटाचे फक्त दहाच मंत्री आहेत. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेले असे अनेक सांगत होते. मात्र, त्यांच्या इच्छेवर आजच्या शपथविधीमुळे पाणी फरले आहे.

Eknath Shinde, Devendra Phadnis, Ajit Pawar News
Supriya Sule News : अजित पवारांच्या शपथविधीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

राज्याच्या राजकारणात २०१९ नंतर पहिले भाजपा नेते देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांचा शपथविधी, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार नंतर शिवसेनेतील फूट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी आणि आता पुन्हा एकदा अजित पवारांचा शपथविधी असे एकामागून एक धक्के बसले आहेत.त्यामुळे सामान्य नागरिक मात्र गोंधळून गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com