Rohit Pawar Meet Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar Meet Ajit Pawar : रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट; कर्जत MIDC बाबत सविस्तर चर्चा!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडावरून नाराजी मांडलेले, फुटलेल्या आमदारांना पक्षाध्यक्ष शरद पवारांनी दिलेल्या पदांची जाणीव करून देणाऱ्या आमदार रोहित पवारांनी अजितदादांची आज शुक्रवारी भेट घेतली. (Latest Marathi News)

कर्जत-जामखेड मतदारसंघातील ‘एमआयडीसी’चा मुद्दा घेऊन राोहित पवार विधान भवनात अजितदादांकडे गेले, आपली भूमिका मांडली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच अजितदादा आणि राोहित पवारांची पहिलीच भेट झाली, या भेटीआधी राजकीय अर्थ लावला जात होता. मात्र, प्रशासकीय कामाासाठी या दोघांत चर्चा झाल्याचे स्पष्ट झाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंड करून अजितदादांच्या नेतृत्वात ३०-३५ आमदारांनी भाजपसोबत घराेबा केला. या आमदार, माजी मंत्रयांनर रोहित पवार यांनी टार्गेट केले होते. त्यावरून पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ यांनीही रोहित पवारांवर जोरदार हल्ला केला. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीर नेते आणि रोहित पवार समोरासमोर आले होते.

अशात विधीमंडळाच्या अधिवेशनात रोहित पवारांनी एमआयडीसीचा मुद्दा लावून धरला. त्यासाठी बैठकीकडे सरकारने काणाडोळा केल्याने रोहित पवार भडकले होते. या विषयात रोहित पवारांचे विरोध आमदार राम शिंदे यांची एन्ट्री झाली. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी निर्णय घेतला. रोहित पवारांच्या मतदारसंघातील या एमआयडीसीचा मुद्दा गाजला. त्यात अजितदादा आणि रोहित पवारांचीही भेट झाली.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत - जामखेड विधानसभा मतदार संघासाठी कर्जत येथे पाटेगाव-खंडाळा येथे होणाऱ्या एमआयडीसीचा प्रश्न सध्या विधानसभेतही केंद्रस्थानी आले होते. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असून, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) तर भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी एकमेकांवर आरोप केल्याने हा मुद्दा चर्चेत आला होता.

दरम्यान, रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघात मंजूर झालेल्या एमआयडीसीसंबंधीचा जीआर काढण्याच्या मागणीसाठी विधानभवनाच्या आवारातच सोमवारी उपोषणाचं शस्त्र उपसलं होते. यानंतर काही तासांनंतर उद्योगमंत्री उदय सामंतांनी त्यांची भेट घेतल्यानंतर जीआर काढण्याच्या आश्वासन दिल्यानंतर रोहित पवारांनी उपोषण मागे घेतले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT