Rohit Pawar met Eknath Shinde, Devendra Fadnavis
Rohit Pawar met Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

रोहित पवारांनी घेतली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांची भेट : या मागणीचे दिले निवेदन

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाले आहे. महाविकास आघाडीने ज्या कामांना मंजुरी दिली होती. अशी कामे शिंदे गट व भाजपकडून स्थगित केली जात आहेत. यात कर्जतमधील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या कामाचाही समावेश आहे. त्यामुळे या कामाची स्थगिती राज्य सरकारने उठवावी या मागणीचे निवेदन आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ( Rohit Pawar met Eknath Shinde, Devendra Fadnavis: Statement of this demand )

कर्जतमध्ये दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. मात्र सध्या या निर्णयास स्थगिती देण्यात आली असून ती उठविण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली. यावेळी विधानसभेचे माजी सभापती नरहर झिरवळ उपस्थित होते.

या भेटी संदर्भात आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, कर्जतमधून दाखल होणाऱ्या दिवाणी दाव्यांची संख्या मोठी असून त्यातील अनेक दाव्यांसाठी 65 किलोमीटर प्रवास करुन अहमदनगर इथं जावं लागतं. त्यामुळं कर्जतला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची गरज आहे. याबाबत धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार रोहित पवार यांनी काल ( रविवारी ) सोशल मीडियावर पोस्ट टाकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कामाला स्थगिती न देण्याची विनंती केली होती. आज त्यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT