MLA Rohit Pawar Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar On Lok Sabha : मध्यावधी निवडणुकांबाबत पवाराचं मोठे विधान ; म्हणाले, "डिसेंबरमध्ये.."

Maharashtra Politics : ईव्हीएम मशीनची तपासणी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो़

Mumbai News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे देशाचे लक्ष लागलं आहे, अशातच राष्ट्रवादीचे (NCP) आमदार (शरद पवार गट) रोहित पवार यांनी मोठ विधान केलं आहे. ते आज (बुधवारी) माध्यमांशी बोलत होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्र होण्यार असल्याची चर्चा आहे. त्यावर रोहित पवारांनी हे विधान केलं आहे.

रोहत पवार म्हणाले, "लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या पाच-सहा महिने आधी ईव्हीएम मशीन तपासल्या जातात. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीनची तपासणी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डिसेंबर 2023 मध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात," कर्नाटक निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव झाल्याने ही सर्व प्रक्रिया सुरु झाल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे शरद पवार , सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वांना मोठा धक्का बसला.

अजित पवारांच्या या मोठ्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशामध्ये आता या बंडखोरीचे सर्व खापर आमदार रोहित पवार यांनी थेट भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले आहे.

याबाबत रोहित पवारांनी टि्वट करीत भाजपवर निशाणा साधला आहे. "महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात तुडवणारी..मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनेला आपापसात झुंजायला लावून विकृत आनंद घेणारी...आणि हाच प्रयोग आता राष्ट्रवादीच्या बाबतीत करणारी महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण असावी?" अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली आहे.

दोन जुलैरोजी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादीतील नऊ आमदार शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाची आज मुंबईत बैठक आहे. दोन्ही बैठकांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. या दोन्ही बैठकीसाठी राष्ट्रवादीचे आमदार मुंबईकडे रवाना झाले आहे.

या बैठकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांनी अंधारात ठेवून काही आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याचा, दिशाभूल केल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे कोणासोबत किती संख्याबळ याचा नेमका खुलासा आजच्या बैठकांमध्ये होण्याची शक्यता आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT