Jitendra Awhad Tweet: यशवंतरावांच्या चेल्यासाठी, शरद पवारांसाठी आपल्याला यायचं आहे...!

Maharashtra NCP Crisis : कोणत्या गटाकडे किती आमदार आहेत हे काही तासांमध्येच कळेल.
Maharashtra NCP Crisis News
Maharashtra NCP Crisis News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर दोन्ही गटाकडून दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गटाची बैठक नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बोलावल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि पक्षाचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तर नवनियुक्त मंत्री आणि अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनीही राष्ट्रवादीची बैठक वांद्राच्या एमईटी कॉलेजमध्ये आजच बोलावली आहे.

दोन्ही बैठका एकाच दिवशी असल्याने या बैठकींच्या उपस्थितीवरून कोणत्या गटाकडे किती आमदार आहेत हे काही तासांमध्येच कळेल. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या बाबत आव्हाडांनी टि्वट केलं आहे.

Maharashtra NCP Crisis News
Todays NCP Meeting: राष्ट्रवादी कुणाची ? आज ठरणार..; काका-पुतण्याचे मुंबईत शक्तीप्रदर्शन..

"राजकारणातील सह्याद्रीसाठी, यशवंतरावांच्या चेल्यासाठी, तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या शरद पवार यांच्यासाठी आपल्याला यायचं आहे," असे टि्वट आव्हाडांनी केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी पक्षांतर्गत 50 पेक्षा अधिक आमदारांना भाजपा सोबत जायचं होतं तशा हालचाली, चर्चा यापूर्वी झाल्या होत्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण जयंत पाटील यांनीच असे पत्र शरद पवारांना त्रास होईल म्हणून न दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

अजित पवार यांनी अंधारात ठेवून काही आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याचा, दिशाभूल केल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे कोणासोबत किती संख्याबळ याचा नेमका खुलासा आजच्या बैठकांमध्ये होण्याची शक्यता आहे.

‘आम्हीच खरे राष्ट्रवादी’ असा दावा करणारे काका-पुतणे (शरद पवार व अजित पवार) बुधवारी मुंबईत स्वतंत्र बैठकांद्वारे शक्तिप्रदर्शन करीत आहेत. भाजपला पाठिंबा देण्याबाबत ४० आमदारांच्या सह्यांचे आपल्याकडे पत्र आहे. त्यामुळे पक्ष व चिन्ह आमच्याकडेच असा दावा अजित पवार गटाने केला आहे. तर अनेक आमदार आमच्याकडे परत येत असल्याचा दाव शरद पवार गटाने केला आहे.

यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार गटाची तर भुजबळ नॉलेज सिटीत अजित पवार गटाची बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंच्या प्रतोदांनी व्हीपही बजावला आहे अनेक आमदार काल (मंगळवारी) रात्रीच मुंबईत आले आहेत. अखेरपर्यंत पळवापळवीचे प्रयत्न सुरू असल्याने त्यांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले असल्याची माहिती आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com