MLA Rohit Pawar
MLA Rohit Pawar Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar : पवार म्हणाले, 'शिंदे सरकारचं आता अती होतयं, हा रडीचा डाव..'

सरकारनामा ब्युरो

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आक्रमक आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणी वाढत आहेत. काल (रविवारी) आव्हाड यांची जामिनावर सुटका झाली आहे. बाहेर आल्यानंतर ७२ तासात त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. खोटा गुन्हा दाखल झाल्याचे सांगत आज सकाळी आव्हाडांनी राजीनामा देणार असल्याचे टि्वट केलं आहे. (ncp mla Jitendra Awhad resign news update)

आव्हाडांच्या टि्वटनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी आव्हाडांनी राजीनामा देऊ नये, सुडबुद्धीने ही कारवाई केली जात असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी आव्हाडांचे टि्वट रिटि्वट करीत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हा गुन्हा दाखल झाल्यामुळे आव्हाड यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. नेमकं असं काय घडलं, ज्यामुळे आव्हाड राजीनामा देत आहे, त्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे. आव्हाड यांच्यावर एका महिलेने गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एका महिलेला ढकलल्याचा जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

"सरकारचं आता अती होतंय! एकदा प्रयत्न करून बघितला पण सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे!

तक्रारदाराची राजकीय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे?," असे टि्वट रोहित पवार यांनी केलं आहे.

कळवा खाडी पुलाचे उद्धाटन काल (रविवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उद्धाटन कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याबाबत मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT