Ashish Shelar : आव्हाड, 'राजीनामा द्या, ती जागाही आम्ही जिंकू ' ; शेलाराचं खुलं आव्हान

Ashish Shelar : "आव्हाडांनी कायदेशीर बाजूनं लढावं. त्यांनी राजीनामा दिला ती जागा आम्ही लढू,'असे शेलार यांनी सांगितले.
Jitendra Awhad resign news update
Jitendra Awhad resign news updatesarkarnama
Published on
Updated on

Ashish Shelar : भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आव्हाडांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी जाळपोळ करण्यास सुरवात केली आहे. आव्हाडांच्या या निर्णयामुळे राजकारण तापलं आहे. (Jitendra Awhad resign news update)

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. "आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्याचा आणि त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा काहीही संबध नाही," असे शेलार म्हणाले. "आव्हाडांनी कायदेशीर बाजूनं लढावं. त्यांनी राजीनामा दिला ती जागा आम्ही लढू,'असे शेलार यांनी सांगितले.

अभियांत्रिकी अभ्यासाचे मराठीतील पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे. त्यामुळे आता राज्यातील ग्रामीण भागातील मुलांना त्यांचा फायदा होईल. मुंबईत मराठी शाळा बंद पडत असताना मराठी शिक्षणावर काही जण राजकारण करीत आहे," असा टोला शेलारांनी ठाकरे गटाचे नाव न घेता लगावला आहे.

Jitendra Awhad resign news update
Jitendra Awhad resign : आव्हाडांवर विनयभंगाच्या गुन्हा दाखल ; राष्ट्रवादीकडून जाळपोळ

कळवा आणि ठाणे शहाराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्धाटन काल (रविवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या उद्धाटन कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याबाबत एका 40 वर्षीय महिलेने मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Jitendra Awhad resign news update
मोठी बातमी : Jitendra Awhad राजीनामा देणार ; टि्वटमुळे खळबळ

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल मुंब्रा येथील कार्यक्रमात ही घटना घडली असल्याचे संबधित भाजप महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. आव्हाडांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीलाला स्पर्श करत बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, याप्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com