Sharad Pawar Press Conference
Sharad Pawar Press Conference Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Press Conference : पत्रकार परिषदेत जेष्ठांच्या मागे यंग ब्रिगेड; शरद पवारांना काय सुचवायचंय?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि.5 मे ) आपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतला. शरद पवार यांनी आज मुंबईतील वाय.बी.सेंटर येथे पत्रकार परिषद घेत आपली सविस्तर भूमिका मांडली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर शरद पवारच कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

आज मुंबईतील वाय.बी.सेंटर येथे शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांच्या पाठिमागे राष्ट्रवादी काँग्रेसमधील यंग कार्यकर्ते आणि तरुण आमदार बसलेले पाहायला मिळाले. यामध्ये आमदार रोहित पवार, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान हे पक्षातील तरुण चेहरे शरद पवारांच्या पाठिमागे बसलेले होते.

त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं होतं.

त्यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही संघटनात्मक बदल होण्याचीही चर्चा होती. त्यातच आज बोलताना पुन्हा "पुढील काळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे आणि नवीन नेतृत्व तयार करण्यावर भर असेल", असं शरद पवार यांनी म्हटलं.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुण आणि नव्या चेहऱ्यांना येणाऱ्या काळात संधी दिली जाणार का?, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेवेळी पाठिमागे बसलेले तरुण चेहऱ्यांच चित्र खूप काही सांगून जाणारं आहे. त्यातच या माध्यमातून शरद पवारांना नेमकी काय सुचवायचं आहे?, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

शरद पवार काय म्हणाले?

"मी पुन्हा अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे गरजेचे असते. त्यामुळे माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करण्यावर भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसापर्यंत पोचवण्यासाठी यापेक्षा अधिक जोमाने काम करील", असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT