Mumbai Shivsena News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. उबाठा गटाच्या मुंबई घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकरनगर भागातील प्रभाग क्रमांक 125च्या नगरसेविका रूपाली आवळे आणि त्यांचे पती सुरेश आवळे व त्यांच्या समर्थकांनी शनिवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
या वेळी शिंदे यांनी आतापर्यंत मुंबईतील 53 माजी लोकप्रतिनिधींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना विकास हवा आहे, म्हणून त्यांनी विकासाला साथ दिली आहे. तसेच यापुढेही आणखी प्रवेश होणार असल्याचा दावा केला. ज्यांना विकासावर विश्वास असेल, ते येत्या काळात शिवसेनेत येतील आणि त्यांची कामे होतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठाण्यातील शिंदे यांच्या शुभ दीप या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश समारंभ पार पडला. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, आवळे यांनी आपल्याकडे त्यांच्या वॉर्डातील समस्या मांडल्या आहेत, त्या समस्या सुटत नसल्यानेच त्यांनी आता विकासाला साथ दिली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून मुंबईत डीप क्लीन ड्राइव्हच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदूषण कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच विविध विकासकामे केली जात आहेत. त्यामुळेच आतापर्यंत 53 हून अधिक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापुढेही पक्ष प्रवेश सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
तसेच मी घरात बसणार मुख्यमंत्री नाही तर रस्त्यावर उतरून काम करणारा मुख्यमंत्री असल्यानेच अनेकांना आपल्यावर विश्वास दाखविला असल्याचे सांगत त्यांनी या वेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. या पक्ष प्रवेशप्रसंगी आमदार प्रकाश सुर्वे, राम रेपाळे आदी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.