Pratap Sarnaik Vs Thackeray Group : गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या राजकीय घडमोडी घडल्या आहेत. २०२२ मध्ये शिवसेनेत ( Shivsena ) उभी फूट पडली. यानंतर अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना पाठिंबा दर्शवला. यात ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक हेही होते. पण, आता शिवसेनेनं ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. ठाकरे गटानं सरनाईकांविरोधात उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या लढतिकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. ( Naresh Manera Vs Pratap Sarnaik Fight Ovala Majiwada Assembly constituency )
खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी ठाकरे गटाकडून ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करून टाकला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे माजी उपमहापौर नरेश मणेरा अशी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या ज्येष्ठ शिवसैनिकांमुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार असल्याचं दिसत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माजी उपमहापौर नरेश मणेरा आयोजित महाराष्ट्र महोत्सव घोडबंद रोड येथे सुरू आहे. या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत आणि खासदार राजन विचारे यांनी उपस्थिती लावली. यावेळी संजय राऊत म्हणाले, "मणेरांना विधानसभेवर पाठवण्याची जबाबदारी राजन विचारेंची आहे."
तेव्हा येथे 'पल पल दिले के पास...' हे गाण लागलं होतं. याला पकडून संजय राऊतांनी म्हटलं, "या गाण्याप्रमाणे शिवसेना आहे. तिला कुणीच आपल्या मनातून काढू शकत नाही. आपण बाजीगर आहोत. बाकी बाजीराव येतात आणि जातात. त्यामुळे खरे बाजीगर येथे आहेत."
"राजन विचारेंनी ठाण्याचा गड उत्तमरितीनं सांभाळला आहे. शिवाय ही गर्दी पाहून माझा विश्वास पटला की, ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं आहे," असं राऊत म्हणाले.
नरेश मणेरा कोण आहेत?
नरेश मणेरा हे ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर असून ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. तसेच, ते ओवळ-माजिवाडा विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.