Chandrakant Patil-Rupali Chakankar Sarkarnama
मुंबई

रूपाली चाकणकर म्हणतात; चंद्रकांतदादांच्या शुभेच्छा मिळाल्या की वर्षभर चिंता नसते

विधान भवनाच्या आवारात प्रदेशाध्यक्ष पाटील व रूपाली चाकणकर यांची भेट झाली.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : चाकणकरताई तुमचे काम जोरात सुरू आहे. महिला आयोगाच्या कामाचे रोजच अहवाल येत असतात, असे कौतुक करीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali chakankar) यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विधान भवनाच्या आवारात प्रदेशाध्यक्ष पाटील व रूपाली चाकणकर यांची भेट झाली. चाकणकर यांनी नमस्कार करताच पाटील यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर बोलताना चाकणकर म्हणाल्या, ‘‘ चंद्रकांतदादांच्या शुभेच्छा मिळाल्या की वर्षभर चिंता नसते.’’ अधिवेशन काळात महिला आयोगाचे काम करता यावे, यासाठी आयोगाला विधान भवनाच्या आवारात एक केबीन घ्या. तशी मागणी करा, असा सल्ला यावेळी पाटील यांनी चाकणकर यांना दिला.

राजकीय विषयावर चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यावर अनेकवेळा टीका केली आहे.मात्र, आज समोरासमोर येताच दोघांनी संवाद साधला.महिला दिन असल्याने पाटील यांनी चाकणकर यांना शुभेच्छा दिल्या.राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक कटुता असू नये.महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खूप संपन्न आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध निकोप असावेत, अशी आपली भूमिका असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

चाकणकर या यापूर्वी पुणे शहराच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष होत्या.चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी चाकणकर यांच्याकडे देण्यात आली.त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद चाकणकर यांना मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT