Rupali Patil

 

sarkarnama

मुंबई

राज ठाकरेंची साथ सोडलेल्या रुपाली पाटलांचे बाळासाहेबांना अभिवादन

बाळासाहेब हे देशाचे दैवत आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची साथ सोडलेल्या माजी नगरसेविका रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसधील प्रवेशानंतर काही तासांतच दादर गाठून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन केले. शिवसेनेची ऑफर नाकारल्यानंतर आणि राष्ट्रवादीतील प्रवेशावरही खूष झालेले युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी रुपाली पाटील यांना शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली रुपाली यांना राष्ट्रवादीत लवकरच पदाचाही मान मिळण्याचे संकेत दिले गेले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा करिष्मा पाहून राजकारणात उतरलेल्या पाटील यांनी पक्षातील काही नेत्यांच्या कारस्थानाकडे बोट दाखवत तब्बल १४ वर्षाच्या प्रवासानंतर मंळवारी रात्री पक्ष सोडला. त्यानंतर त्या शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा अंदाज होता. मात्र, राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द देत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुपाली यांना राष्ट्रवादीत आणले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पवार यांनीच रुपाली यांचा शुक्रवारी मुंबईत पक्षप्रवेश घडवून आणला.

रुपाली पाटील यांच्या कामाचे, लोकांचे प्रश्न सोडविण्याच्या त्यांच्या स्टाईलचे कौतुक करीत जयंत पाटील आणि पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्ष प्रवेश आटोपल्यानंतर रुपाली यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन शिवाजी पार्कातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन केले. बाळासाहेब हे देशाचे दैवत आहे. त्यांच्या विचारांनी वाढल्याने याआधी राज ठाकरे यांच्यासोबत काम करता आले. नव्या राजकीय वाटचालीतही बाळासाहेबांची आठवण झाली; त्या भावनेतून मी इथे पोचले, असे रुपाली यांनी सांगितले. मी राष्ट्रवादीत आली असली, तरीही अन्य पक्षातील लोकांशी माझे चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीतील प्रवासाला अनेकांची शुभेच्छा दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT