Sachin Ghaiwal, Nilesh Ghaiwal, Yogesh Kadam  sarkarnama
मुंबई

Sachin Ghaiwal: चार दिवस गाजणारा विषय फडणवीसांनी एका वाक्यात संपवला; सचिन घायवळ प्रकरणात योगेश कदमांना क्लिनचीट

Sachin Ghaiwal: गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केल्यावरुन गृहराज्यमंत्री योगेश कदम हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Amit Ujagare

Sachin Ghaiwal: गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केल्यावरुन गृहराज्यमंत्री योगेश कदम हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अनेक गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या सचिन घायवळवर इतकी मेहरबानी का दाखवली गेली? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. गेल्या चार दिवसांपासून हे प्रकरण महाराष्ट्रात चर्चेत आहे. यामुळं गृहमंत्रीपदाची जबाबदारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची देखील बदनामी होत होती. पण आज या प्रकरणावर फडणवीसांनी पहिल्यांदाच भाष्य करताना केवळ एकाच वाक्यत विषय संपवून टाकला.

माध्यमांशी बोलताना फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, सचिन घायवळला गृहराज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी मंजूर केलेल्या शस्त्र परवान्यामुळं सरकारवर टीका होत आहे. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "यासंदर्भात एक सुनावणी गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती. पण हा परवाना दिलाच गेला नाही. पोलीस आयुक्तांनी याबाबतची वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. त्यामुळं हा परवाना दिलेला नाही. परवाना दिला असता तर कदाचित अशा प्रकारचा आरोप योग्य होता. परंतू परवाना दिला गेलेला नाही"

दरम्यान, फडणवीसांनी अशा प्रकारे एकाच वाक्यात या विषयावरील चर्चेला पूर्णविराम दिला. पण त्याचबरोबर योगेश कदम यांनी दिलेल्या शस्त्र परवान्याबाबत क्लीनचीटही देऊन टाकली. त्यामुळं या प्रकरणावरुन विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याच्या चर्चेलाही आता पूर्णविराम मिळाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं कदम यांना यांच्याासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

पण योगेश कदम यांनी सचिन घायवळला दिलेल्या शस्त्र परवान्याच्या मंजुरीचं पत्र साम टीव्हीच्या हाती आली असून २४ जून २०२५ रोजी हा आदेश काढण्यात आला आहे. यावर योगेश कदम यांची स्वाक्षरी देखील आहे. यामध्ये पोलीस आयुक्त पुणे शहर यांना अपिलार्थी सचिन बन्सिलाल घायवळला विहीत कार्यपद्धती अवलंबून शस्त्र परवाना देण्याबाबत पुढील कारवाई करावी असे आदेश देण्यात यावेत असं नमूद करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT