anil deshmukh sachin waze devendra fadnavis.jpg sarkarnama
मुंबई

Video Sachin Waze : मोठी बातमी! सचिन वाझेचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, जयंत पाटलांचेही घेतलं नाव; म्हणाला, फडणवीसांना...

Sachin Waze allegations Against Anil Deshmukh : सचिन वाझे तुरूंगात आहे. तुरूंगात गेल्यापासून पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत सचिन वाझेनं अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत.

Akshay Sabale

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. यातच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेनं अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

"अनिल देशमुख स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. याचे पुरावे मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहेत. मी नार्को टेस्टला तयार आहे," असं मोठं विधान सचिन वाझेनं ( Sachin Waze ) केलं आहे. यासह सचिन वाझेनं जयंत पाटील यांचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

'एएनआय'शी संवाद साधताना सचिन वाझेनं म्हटलं, "माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. ते ( अनिल देशमुख ) स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे मी 'सीबीआय'कडे दिले आहेत. याच प्रश्नी मी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना एक पत्र लिहिलं आहे. फडणवीस यांना अनिल देशमुख यांच्याबाबतचे सर्व पुरावे दिले आहेत. मी नार्को टेस्टला तयार आहे. फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव आहे."

याप्रकरणावर शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या, सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे म्हणाल्या, "सचिन वाझे काय हरिशचंद्र आहे काय? सचिन वाझे स्वत: आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. सचिन वाझेची आरोप करण्याची वेळ महत्वाची आहे. अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत, त्यातच वाझेनं पत्र लिहिलं आहे."

"वाझेला पत्र लिहायाचं होते, तर इतके दिवस का वाट बघितली? आता का पत्र लिहावं वाटले. एखादी तपास यंत्रणा किंवा प्राधिकृत संस्थेला का पत्र लिहिलं नाही? ते पत्र फडणवीसांना का लिहिलं आहे? देवेंद्र फडणवीस यांच्यावर सरकार पाडणे, आमदार फोडणे असे आरोप आहेत. वाझेनं देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्यानंतर संशयाला जागा मिळते. लोकांना मुर्खात काढण्याचा प्रयत्न आहे. भाजप वारंवार अनेकांवर आरोप करते. ती लोक सरेंडर झाल्यावर परत त्यांना सामावून घेते. परमबीर सिंह यांनाही तसेच सामावून घेतलं आहे. उदंराला मांजराची साक्ष म्हणून वाझेचं वक्तव्य दाखविणार का?" असा सवाल सुषमा अंधारेंनी केला आहे.

"देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर हल्ले होते आहे. फडणवीस संशयाच्या भोवऱ्यात आहेत. फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला, संस्कृती पायदळी तुडवली, अनेक पक्ष फोडले, कायदा-सुवस्थेचा वापर विरोधकांना जायबंदी करण्यासाठी केला. हे सगळे आरोप असताना स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी फडणवीसांनी वाझेकडून हे पत्र कशावरून लिहून घेतलं नाही?," अशी शंका सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT