Sada Sarvankar Mahesh Sawant Eknath Shinde .jpg Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Shinde: सरवणकरांच्या 20 कोटींच्या दाव्यानं खळबळ,ठाकरेंचा पठ्ठ्या शिंदेंसमोरच भडकला; म्हणाला,'आम्ही पण 'दादा'गिरीतून...'

Mahesh Sawant vs Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (ता.23) पार पडली. याच बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माहीम मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश सावंत हे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या निधीच्या वक्तव्यावरुन चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं.

Deepak Kulkarni

थोडक्यात बातमी:

  1. माजी आमदार सदा सरवणकर यांच्या "२० कोटी निधी मिळाला" या वक्तव्यामुळे महायुती आणि शिंदे गट अडचणीत आले.

  2. मुंबईतील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उद्धव गटाचे आमदार महेश सावंत यांनी सरवणकरांवर आणि शिंदेंवर थेट हल्लाबोल केला.

  3. सावंत यांनी शिंदेंना निधीच्या वाटपाबाबत प्रश्न विचारत "निधी वैयक्तिक विकासासाठी वापरला गेला" असा गंभीर आरोप केला.

Mumbai News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू नेते आणि शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या एका वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. इतर आमदारांना 2 कोटी निधी मिळतो, पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळतो, असं विधान करत सरवणकर यांनी स्वत:सह महायुती अन् शिवसेनेचीही मोठी अडचण केली आहे. याच वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) पठ्ठा थेट शिंदेंनाच भिडल्याचं पाहायला मिळालं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (ता.23) पार पडली. याच बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माहीम मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश सावंत हे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या निधीच्या वक्तव्यावरुन चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं.

आमदार महेश सावंत यांनी या बैठकीत एकनाथ शिंदेंना थेट पोस्टर दाखवत माजी आमदार सदा सरवणकर यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या वक्तव्याचा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे, पण आम्ही पण 'दादा'गिरीतून आलो असल्याचंही सावंत यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) ऐकवायला मागेपुढं पाहिलं नाही.

उद्धव ठाकरेंचे आमदार महेश सावंत यांनी या बैठकीत माजी आमदार सदा सरवणकर यांच्यावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, तुमच्या आमदारांना तुम्ही निधी दिला, त्यांनी या निधीतून फक्त स्वत: चा विकास केला. त्यामुळे, आता तुम्ही त्यांना समज द्या, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला.

महेश सावंत यांनी या बैठकीत एकनाथ शिंदेंना आम्हाला निधी द्या, आम्ही अनेक पत्रके दिली असल्याचंही सांगितलं. तसेच माजी आमदार बोलत आहे की, आम्हाला 20 कोटी रुपयांचा निधी भेटतो आणि आम्हाला निधी मिळत नाही. माजी आमदारांना तुम्ही खूप निधी दिला आहे, पण कामे झाली नाहीत, त्यांनी तो निधी स्वत:चा विकास करण्यासाठी वापरल्याची टीकाही त्यांनी केली.

प्र.१: सदा सरवणकर अडचणीत का आले?
उ.१: त्यांनी आमदार नसतानाही २० कोटी निधी मिळाल्याचं विधान केलं.

प्र.२: महेश सावंत यांनी बैठकीत काय केलं?
उ.२: त्यांनी शिंदेंना थेट पोस्टर दाखवत सरवणकरांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला.

प्र.३: निधीबाबत काय आरोप झाले?
उ.३: निधी वैयक्तिक विकासासाठी वापरला गेला, असा आरोप सावंत यांनी केला.

प्र.४: उद्धव ठाकरे पक्षाचा मुख्य संताप कशावर होता?
उ.४: आमदारांना निधी न मिळणे आणि माजी आमदारांना जास्त निधी देण्यात आल्यावर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT