Sadabhau Khot Sarkarnama
मुंबई

Sadabhau Khot : विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच सदाभाऊंचं 'वजन' वाढलं; दरेकरांची मिठी अन् मीडियाचाही गराडा!

Sadabhau Khot Legislative Council candidature : जाणून घ्या, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी नेमकी काय दिली आहे प्रतिक्रिया?

Jagdish Patil

Sadabhau Khot on Vidhan Parishad News : शेतकरी स्वाभिमान संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची वर्णी विधान परिषदेच्या आमदारपदी लागली आहे. भाजपने नुकतंच एक परिपत्रक काढत याबाबतची घोषणा केली आहे. तर आमदारपदी वर्णी लागताच सदाभाऊ खोत यांचे राजकीय वजनही चांगलंच वाढल्याचं दिसत आहे.

विधानसभेच्या आवारात सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) आणि त्यांचे सहकारी गोपीचंद पडळकर येताच, त्यांच्याभोवती मीडियाचा गरडा पडला. शिवाय यावेळी मीडियाशी बोलण्यात व्यस्त असणारे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मीडियाला बगल देत थेट सदभाऊ यांच्या अलिंगन दिले आणि हस्तांदोलन करत सदाभाऊंना शुभेच्छा दिल्या. शिवाय मीडियादेखील इतर नेत्यांना सोडून सदाभाऊंच्या मागे गेल्याचा पाहायला मिळाला.

त्यामुळे आमदारकी मिळताच सदाभाऊंचं राजकीय वजन वाढल्याचं दिसून आलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सदाभाऊ म्हणाले, आज कृषी दिन आहे. कृषी दिनाच्या दिवशीच मला भाजपने संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह राज्यातील आमचे नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.

तसेच माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याला पक्षाने ही जबाबदारी दिली आहे. आज कृषी दिन आहे आणि याच दिनाचे औचित्य साधून मला उमेदवारी दिली त्याचा मी आदर करतो आणि इथून पुढे शेतकऱ्यांचे कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार करतो.

भाजपकडून विधानपरिषदेची यादी जाहीर-

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठीची ५ नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपमध्ये विधानपरिषदेसाठी अनेकजण इच्छुक होते. पण अखेर भाजपाने बीड लोकसभा मतदारसंघाच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे(Pankaja Munde), डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. भाजपने नुकतंच एक परिपत्रक काढत या पाच नेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT