Sharad Pawar and Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar: अजितदादांनी शहराध्यक्षच फोडला! लगेचच केली राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी नियुक्ती; शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का!

Sadashiv Patil joins Ajit Pawar NCP: अंबरनाथचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पक्ष सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतर काही तासांतच सुनील तटकरे यांनी त्यांना अंबरनाथ शहराध्यक्षपदाची नियुक्ती केली आहे.

Mangesh Mahale

Ambarnath NCP News: स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. अनेक नेते पुढील राजकीय भविष्यासाठी पक्ष सोडून संधी देणाऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत.

अंबरनाथ शहरात असा पक्ष प्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील हे अजित पवार यांच्या पक्षाच्या गळाला लागले आहे. त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाला सोडून अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

प्रवेश सोहळ्यापूर्वी काही तासाच्या आतच सदाशिव पाटलांची राष्ट्रवादी काँग्रेसने त्याच पदावर अर्थात अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षप्रवेशानंतर लगेचच सुनील तटकरे यांनी सदाशिव पाटील यांना अंबरनाथ शहर अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र दिले.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खासदार आनंद परांजपे, पक्षाचे चिटणीस प्रवीण खरात आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सदाशिव पाटील यांच्या उपस्थितीत सदाशिव पाटील यांचा पक्ष प्रवेश झाला.

सदाशिव पाटील यांना पुन्हा एकदा अंबरनाथ शहरात पक्षाचे संघटन मजबूत करण्याची आणि पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली आहे. पाटील यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अंबरनाथमध्ये मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.  

सदाशिव पाटील त्यांच्यासोबत अंबरनाथचे माजी नगरसेवक सचिन पाटील, महिला आधाडी अध्यक्ष पूनम शेलार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सदाशिव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्ष संघटना बळकट झाली असून पाटील यांच्या नेतृवात अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत होणार असल्याचा दावा तटकरे यांनी नियुक्ती पत्रात केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT