Mumbai News, 16 Jan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या राहत्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात शिरून एका अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यानंतर त्याला मध्यरात्री लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आता त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
मात्र, सैफ अली खानच्या घराबाहेर सुरक्षारक्षक तैणात असतानाही सैफवर झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर आता या प्रकरणाचा तपास पोलिस (Police) तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या व्यक्तीने हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावळी त्यांनी अशा प्रतिष्ठीत व्यक्तींवर घरात शिरून हल्ला होत असेल तर सर्वसामान्य माणसांच्या सुरक्षेचं काय? असा सवाल करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. खासदार गायकवाड म्हणाल्या, या घटनेमुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं समोर आलं आहे.
मुंबईत गोळीबाराच्या आणि महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. बीड, परभणी तसंच बाबा सिद्दीकी यांच्या ऑफिसबाहेरच्या सर्व घटना म्हणजे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचं अधोरेखीत करत आहेत. त्यामुळे आता लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरात घुसून जर असा हल्ला होत असेल तर पोलिसांवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.
शिवाय यामुळे राज्यातील गृहविभाग, पोलिस आयुक्त काही काम करत आहेत की नाही? गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. लोक बंदूक, कोयते आणि चाकू घेऊन फिरत आहेतच आता ते थेट घरात घुसून हल्ला करतायत, याचं उत्तर सरकारला उत्तर द्यावं लागेल.
प्रतिष्ठित, सुरक्षा असलेले व्यक्ती सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसांचं काय? असा सवाल करत त्यांनी सरकारवर आणि पोलिसांवर टीका केली. दरम्यान, सैफ अली खानच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झाल्याची माहिती असून मानेसह हातालाही गंभीर जखम झाल्याचं सांगितलं जात आहे. तसंच त्याच्यावर उपाचर सूरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.