Mumbai News : शिवसेनेतील बंडाला उठाण म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. त्यामुळे महायुतीत त्यांचा दबदबा वाढला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ ते पोचलेत.
आता विधानसभा निवडणुकीत ते काय कामगिरी करता याकडे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बाल्लेकिल्ला. यात ठाणेकर एकनाथ शिंदेंना साथ देतात का? 'सकाळ'च्या पाहणीत सर्व काही समोर आलं आहे.
लोकसभेला महायुती शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नरेश म्हस्के यांनी ‘मविआ’तील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांचा अनपेक्षित पराभव केला. ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघात महायुतीने विजय मिळवला. भिवंडी लोकसभा खेचून आणण्यात महाविकास आघाडीला यश आले. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा दिसत असला तरी प्रत्यक्षात एका जागेचे नुकसान झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये 18 जागांपैकी शिवसेनेकडे (Shiv Sena) 05, भाजपला 09 राष्ट्रवादीला 02, तर मनसे आणि समाजवादी पक्षाकडे प्रत्येकी एक जागा होती. आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 18 जागांपैकी किमान 05 ते 06 ठिकाणी राजकीय प्रस्थापित चित्र बदलण्याची शक्यता 'सकाळ'च्या पाहणीत आता तरी दिसते.
ठाणे जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही आमदार नाही. पण सद्यस्थितीत ठाकरे गटाला किमान 02 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ, कल्याण पश्चिम येथे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. भिवंडी पश्चिम, उल्हासनगर दोन विधानसभा राखण्यासाठी भाजपसमोर आव्हान असणार आहे. शहापूरमधील एकमेव राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारालाही धोक्याचा इशारा आहे.
लोकसभेला पालघरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांनी विजय मिळवला. जनतेने महायुतीला कौल दिल्याने विधानसभेत समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. पालघरमधील 06 विधानसभा मतदार संघात महायुतीतील शिवसेनेत सहभागी झालेले श्रीनिवास वनगा, डहाणू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले, विक्रमगडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील भुसारा, बहुजन विकास आघाडीचे वसईचे हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्यातून क्षितिज ठाकूर आणि बोईसरमधून राजेश पाटील तीन आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या भारती कामडी यांना लोकसभेत चांगली मते मिळालीत. आगामी विधानसभेत महायुती, मविआ आणि बहुजन विकास आघाडी पक्ष आपले राजकीय वर्चस्व पालघरावर कायम राहावे यासाठी प्रयत्नशील आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.