MLA Abu Azmi  Sarkarnama
मुंबई

Abu Azmi Threat Call: आमदार अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

MLA Abu Azmi : अबू आझमी यांना धमकी, राज्याच्या राजकारणात खळबळ

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने फोन आणि व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे आमदार अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी सोमवारी दिली.

या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती देताना अबू आझमी यांनी सांगितलं की, "मला माझ्या वैयक्तिक फोननंबरवर फोन करून आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे".

दरम्यान, या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात यावी, असं आवाहन आमदार अबू आझमी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांना केले आहे.

आमदार अबू आझमी यांनी या प्रकरणाबाबत ट्वीट करत घडलेला प्रकार सांगितला आहे. तर या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT