Sameer wankhede - Aryan Khan Case Sarkarnama
मुंबई

Sameer Wankhede News: वानखेडेंचा पाय खोलात; शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी खोलणार पत्ते ?

Aryan Khan Case: समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसत आहे.

सरकारनामा ब्युरो

SRK Manager’s Testimony: अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसत आहे. आर्यन खान प्रकरणात वानखेडे यांनी केलेल्या चौकशी प्रकरणात गेल्या आठवड्यात सीबीआयने त्यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. या कारवाईदरम्यान, त्यांनी साबीआयने काही रोख रक्कम आणि मालमत्ता जप्तही केली. वानखेडे यांच्या चौकशीनंतर सीबीआयने त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

समीर वानखेडे (Sameer Wankhede News) आणि त्यांच्या टीमनं जी कारवाई केली त्यामध्ये काही नावं जाणीवपूर्वक वगळली होती. इतकेच नव्हे तर वानखेडे आणि त्यांच्या टीमने आर्यन खानला या प्रकरणातून सोडवण्यासाठी पैशांची डीलही केली होती. अभिनेता शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानीकडे वानखेडेंनी २५ कोटींची मागणी केली होती. तर ५० लाख रुपये हे आगाऊ म्हणून घेतल्याचेही चौकशीतून उघड झाले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व प्रकरणात पूजा ददलानीची साक्षही महत्वाची ठरणार आहे. यात आर्यन खान अटक प्रकरणात वानखेडेंनी केलेला तपास, त्यांनी केलेल्या अटका, त्यांची कारणे, त्यांच्यावर दाखल झालेला खंडणीचा गुन्हा आणि त्यांनी अनेकांशी केलेची चौकशी यावर आता या सर्व प्रकरणावर ददलानी काय बोलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. (Aryan Khen Drugs Case)

सीबीआयनेही या प्रकरणाचा तपास सुरु करत वानखेडेंवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे, तर दुसरीकडे वानखेडे यांनीही या प्रकरणी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. वानखेडे आणि त्यांच्या टीमने चौकशी करताना पक्षपात केल्याचा आरोप करण्यात आला होता. (Sameer wankhede CBI Raid)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT