Sameer Wankhede News : समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा; नेमके काय घडले?

Cbi News : एनसीबीचे (NCB) मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे.
Sameer Wankhede
Sameer WankhedeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : एनसीबीचे (NCB) मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांना उद्या (ता.17) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, वानखेडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

समीर वानखेडे यांना गुरुवारी सीबीआयच्या (BCI) टीम समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबईत समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची चौकशी होणार होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने वानखेडे यांना 22 मे पर्यंत दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांची उद्या होणारी चौकशी थांबली आहे. त्यामुळे समीर येत्या 22 मे ला मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाद मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sameer Wankhede
DK Shivakumar News : कर्नाटकचा तिढा कायम; डी. के. शिवकुमारांनी पक्षासमोर ठेवली 'ही' अट

दरम्यान, समीर वानखेडे यांच्यसह ५ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये एनसीबीच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सीबीआयने २० ठिकाणी छापे टाकले आहेत, ज्यात मुंबई, रांची, कानपूर, दिल्लीचा समावेश असल्यची माहिती मिळत आहे.

Sameer Wankhede
Ncp News : राष्ट्रवादीचं ठरलं : आमदार शेळके अन् तुपेंवर पुण्याची जबाबदारी; मुंडे, खडसे, तटकरे आणि देशमुखांकडे 'हे' विभाग

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात वानखेडे आणि इतरांनी २५ कोटींची मागणी केली. ५० लाख खंडणी घेतल्याचा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे तपास अधिकारी विश्वविजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com