Samruddhi Mahamarg Sarkarnama
मुंबई

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर झळकले 'ते' बॅनर, चर्चांना उधाण

Samruddhi Mahamarg : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणार

सरकारनामा ब्यूरो

Samruddhi Mahamarg : सध्या राज्याच्या राजकारणात समृद्धी महामार्गाची फार चर्चा आहे. हा महामार्ग कधी सुरू होईल याची संगळ्यांनाच उत्सुकता आहे. मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहेत. सध्या ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असुन यावेळी ते नागपूर मेट्रोची सफर करणार आहेत तसेच समृद्धी महामार्गावरुन प्रवासही करणार आहेत. हे होर्डिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या फारच जवळचे आहे.

समृद्धी महामार्गाचे 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी समृद्धी महामार्गावर शेकडोच्या संख्येने होर्डिंग्ज लावले जात आहे. अवघ्या काही फुटांच्या अंतरावर समृद्धी महामार्गाच्या दोन्ही लेनच्या मध्ये विजेच्या खांबाचा आधार घेऊन हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. समृद्धी महामार्ग शेतकरी, उद्योजक, कामगार, सामान्य नागरिक या सर्वांसाठी कसा फायद्याचा आहे या आशयाचे संदेश आणि माहितीही या होर्डिंगवर आहे.

होर्डिंग्जवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो आहेत. तसेच प्रत्येक होर्डिंगवर मुख्यमंत्र्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे. मात्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आनंद दिघे यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

नव्याने बांधण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे.

मुंबई–नागपूर द्रुतगतीमार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा, ८ पदरी आणि १२० मीटर रुंदीचा नियोजित महामार्ग (रस्ता) आहे. हा मार्ग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडणारा आहे. हा महामार्ग १० जिल्ह्ंयातून, २६तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT