Jitendra Awhad raj thackeray  sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : 'सुपारी ठाकरे' उल्लेख करत आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचले, म्हणाले, 'क्लिपमधील तो आवाज...'

Jitendra Awhad raj thackeray Sandeep Deshpande : तुम्हाला माहिती आहे ते किती मोठे मिमिक्री आर्टीस्ट आहेत. सहा वर्षापूर्वीची क्लिप काढून चालवणार असतील तर अशा खूप क्लिप मिळतील, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Roshan More

Jitendra Awhad News : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची एका नेत्यासोबत बोलण्याचा व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप केला आहे. त्या आरोपाला आव्हाड यांनी उत्तर दिले आहे.

'मी म्हटले तो आवाज माझा नाही. तरे हे लोकं काय तपासायला जाणार आहेत का? राज ठाकरे कोणचाही आवाज काढतात त्यांनीच माझी क्लिप तयार केली.', असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तुम्हाला माहिती आहे ते किती मोठे मिमिक्री आर्टीस्ट आहेत. सहा वर्षापूर्वीची क्लिप काढून चालवणार असतील तर अशा खूप क्लिप मिळतील. सुपारी घ्यायची म्हटले तर सुपारी ठाकरे ती घेणारच, असे म्हणत आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचले.

बदलापूर प्रकरणावरू ठाकरेंना टोला

बदलापूरच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी तेथे जायला पाहिजे होते. त्या मुलींच्या आई वडिलांच्या डोक्यावरून हात फिरवायला हवा होता.चोवीस तासाच्या आत राज ठाकरेंनी माणुसकीच्या नात्याने तेथे पोहोचायला हवे होते.

महाराज आम्हाला माफ करा

मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याने जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले अजूनही भक्कम आहेत आणि 'कंत्राटदार सरकार'ला महाराजांचा एक भक्कम पुतळा उभारता आला नाही, हा यांच्या कारभाराचा हिशेब आहे, असे आपल्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे.आज महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्या दिखावेगिरीचा पर्दाफाश झालाय. महाराज आम्हाला माफ करा, असा देखील उल्लेख ट्विटमध्ये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT