Kolkata News : कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
ठिकठिकाणी मोर्चे,कामबंद आंदोलनं अशा विविध मार्गाने या घटनेविरोधात आवाज उठवला जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह केले जात असतानाच आता थेट खासदाराच्या मुलीलाच बलात्काराची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या अल्पवयीन मुलीला बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. या घटनेची पश्चिम बंगाल बाल हक्क संरक्षण आयोगाने तत्काळ दखल घेतली आहे.
मात्र,आता या धमकीमुळे कायदा सुव्यवस्थेवरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आधीच कोलकाता (Kolkata) आरजे कार घटनेमुळे ममता बॅनर्जी सरकारवर भाजपसह डावे पक्ष हल्ला चढवला आहे.
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाचा सर्वच स्तरांतून निषेध नोंदवला जात आहे. अशातच सोशल मीडियावर खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात आंदोलनात सहभागी झालेल्याने थेट तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या मुलीलाच बलात्काराची धमकी दिली. एवढंच नाहीतर काम करणाऱ्याला तब्बल 10 कोटी रुपयांचं बक्षीस दिले जाणार असल्याचेही तो व्यक्ती खुलेआमपणे व्हिडिओत सांगत असल्याचे सांगत आहे.
या धमकीच्या घटनेमुळे पोलिसांसह पश्चिम बंगाल बाल हक्क संरक्षण आयोग अॅक्शन मोडवर आला आहे. एका राजकीय नेत्याच्या 11 वर्षांच्या मुलीबाबत ज्या व्यक्तीने हे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यापाठीमागचा हेतू हा संबंधित अल्पवयीन मुलीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतानाच तिची सुरक्षा धोक्यात आणण्याचा असल्याचा आहे. त्यामुळे या घटनेतील दोषींवर पोलिसांनी पोक्सो,बाल न्याय कायदा आणि यूएन कन्व्हेन्शन ऑन राइट्स ऑफ चाइल्ड अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी डब्ल्यूबीसीपीसीआरने केली आहे.
सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरुद्ध अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने आता घोष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. त्यामुळे संदीप घोष यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एफआयआर दाखल करून भ्रष्टाचाराचा तपास सुरू केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.