Crime News  Sarkarnama
मुंबई

Sangli Crime News : जुन्या भांडणातून इस्लामपुरात दोन गटांत हाणामारी; 76 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 22 जखमी

Islampur News : काठ्या, लोखंडी गज, झांज पथकातील टाळ, दगड आणि विटांचा वापर हाणामारीत करण्यात आला.

Mangesh Mahale

Sangli : जुन्या भांडणाच्या रागातून इस्लामपूर शहरात दोन गटांत हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही गटांच्या सुमारे 76 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंभीर दुखापतीसह एकमेकांच्या घरांवर चाल करून जात नासधूस करणे आणि बेकायदा जमाव जमवून गर्दी हाणामारी केल्याचे गुन्हे पोलिसांनी नोंद केले आहेत. यात २२ जण जखमी झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पोलिसांकडे दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. विनोद वसंत पवार (वय 34, माकडवाले गल्ली) आणि दशरथ राजू पवार (वय 34, माकडवाले गल्ली) अशा दोघांनी फिर्यादी दिल्या आहेत. एकमेकांच्या घरांची नासधूस करण्यात आली. या हाणामारीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांचा बंदोबस्त परिसरात आहे.

इस्लामपूर शहरातील (Islampur) माकडवाले गल्लीत हा प्रकार घडला. जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांतील २२ जण जखमी झाले आहेत. काठ्या, लोखंडी गज, झांज पथकातील टाळ, दगड आणि विटांचा वापर हाणामारीत करण्यात आला.

विनोद पवार यांनी फिर्याद दिली आहे. दहा जणांसोबत मी घरासमोर बोलत बसलो असताना प्रथमेश दिलीप कुचीवाले याने गर्दी जमवून जुन्या भांडणाच्या रागातून हल्ला केला. घरांवर आणि खिडक्यांवर दगडफेक करीत नासधूस केल्याचे विनोद पवार याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दशरथ पवार यांनी विनोद पवार यांच्या गटाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. "बारा जणांसमवेत मी दारात बसलो होतो. या वेळी विनोद पवार 38 जणांचा बेकायदा जमाव घेऊन चालून आला. या सर्वांनी घरांवर दगडफेक करीत नुकसान केले," असे दशरथ पवार यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

या हल्ल्यात विनोद पवार, दशरथ पवार, सुधीर कुचिवाले, प्रशांत कुचिवाले, साहिल कुचिवाले, सुरेश कुचिवाले, संदीप कुचिवाले, यल्लप्पा अन्नाप्पा कुचिवाले, संदीप जाधव, राकेश जाधव, गणेश गुळके, सविता कुचिवाले, पूजा कुचिकोरवी, संतोषी पवार, यल्लप्पा कुचिवाले, रवींद्र कुचिवाले, विनोद कुचिवाले, पूजा कुचिवाले, प्रमोद कुचिवाले, यल्लव्वा कुचिवाले, निकित कुचिवाले, अंकिता कुचिवाले आणि अनिकेत कुचिकोरवी आदी जखमी झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT