Sangram Patil: डॉक्टर, लेखक, व्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले डॉ. संग्राम पाटील यांना आज मध्यरात्री २ वाजता मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर १५ तासांनंतर त्यांची सुटकाही झाली. पण त्यांची सुटका केवळ ते ब्रिटीश नागरिक असल्यानं झाली असल्याचा दावा अॅड. असिम सरोदे यांनी केला आहे. त्यांचं हे विधान सध्या चर्चेत आहे.
"डॉ. संग्राम पाटील यांना पहाटे 2 वाजल्यापासून अटकाव करून ठेवल्यावर आत्ता 15 तासांनंतर सोडण्यात आलं आहे. यानंतर ते एरंडोल या जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या गावाकडे रवाना झाले आहेत. त्यांच्याकडं केवळ युकेचं नागरिकत्व असल्यानं पोलीस त्यांना अटक करू शकलेले नाहीत. सत्तेचं सत्य मांडणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या पोलिसांनी जो त्रास दिला व छळ केला त्याचा निषेध. भारतातून जाताना पोलिसांना भेटून जावं असं बंधनही त्यांच्यावर घालण्यात आलेलं आहे. माझं संग्राम पाटील यांच्याशी बोलणं झालं आणि ते सुरक्षित आहेत"
दरम्यान, डॉ. संग्राम पाटील हे लंडनचे रहिवासी असून ब्रिटनचं नागरिकत्व त्यांच्याकडं आहे. आज पहाटे २ वाजता ते आपल्या कुटुंबासह भारतात दाखल झाले मुंबई एअरपोर्टवर उतरल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना ताब्यात घेतलं. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हे त्यांचं गाव आहे. मुंबईत उतरल्यानंतर याठिकाणी ते जाणार होते. पण तत्पूर्वीच चौकशीच्या नावाखाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर तब्बल १५ तास त्यांची सुटका होऊ शकली नाही. चांगल्या वागणुकीबद्दलचा बॉण्ड लिहून घेऊन काही अटी-शर्ती घातल्यानंतर पोलीस त्यांना सोडून देतील, अशी शक्यता असिम सरोदे यांनी व्यक्त केली होती.
पण मुळातच त्यांना ताब्यात का घेण्यात आलं? हा प्रश्न अनेकांना पडलेला होता. पण अनेकांना माहिती आहे की, संग्राम पाटील हे लेखक आणि व्याख्याते आहेत. त्याचबरोबर ब्लॉग आणि सोशल मीडियावर म्हणजे फेसबूक आणि स्वतःच्या यूट्यूब चॅनेलवरुनही ते सातत्यानं भारतातल्या आणि जगातल्या परिस्थितीविषयची तुलनात्मक भाष्य करत असतात. त्यातूनच त्यांनी अनेकदा मोदी सरकारवरही टीकात्मक भाष्यही केलं आहे आणि याचमुळं डॉ. संग्राम पाटील यांच्यावर भारतात दाखल झाल्यानंतर पोलिसांची त्यांच्यावर नजर होती आणि त्यांनी कारवाईही केली, अशी चर्चा अनेक मान्यवरांकडून सोशल मीडियात सुरु होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.