Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी मुंबईच्या वरळी नाका येथे डीप क्लीनिंग ड्राईव्हमध्ये सहभागी झाले. पालिकेच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत त्यांनी सहभाग घेत स्वत: स्वच्छता केली. निरोगी मुंबई, स्वच्छ सुंदर मुंबईसाठी हे डीप क्लीनिंग ड्राईव्ह सुरू असून लवकरच याचे परिणाम दिसतील, असे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी ठाकरेंना खोचक टोलाही लगावला.
गेल्या काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट चँलेज करत "तुम्ही वरळीतून लढा नाही तर मी ठाण्यातून निवडणूक लढवतो", असं आव्हान दिलं होतं. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात येत ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"वरळीच नाही तर संपूर्ण मुंबई स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. अडीच वर्षांपूर्वीची घाण आम्ही स्वच्छ करत आहोत, आरोप करणाऱ्यांना जनता उत्तर देईल", असा हल्लाबोल करत थेट मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) ठाकरेंना नाव न घेता डिवचलं.
"कधी रस्ते धुताना पाहिले होते का ? खूप आधी रस्ते धुतले जायचे. पण आता एक दिवसाआड रस्ते धुतले जाणार आहेत. यासाठी यंत्रणाच लावायची आहे. जेणेकरून रस्त्यावरील धूळ, माती निघेल. मात्र, यासाठी पिण्याचे पाण्याच्या पाण्याचा गैरवापर होणार नाही, याची काळजीही घेतली जाणार आहे", असेही शिंदे म्हणाले.
दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून बैठका, मेळाव्यांचा धडाका सुरु आहे. यातच मुख्यमंत्री शिंदेंनी थेट ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात जात जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे यावर आता ठाकरे काही प्रत्युत्तर देतात का? हे पाहावं लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.